भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवरून SSB-६३ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबतची कागदपत्रे डाउनलोड करून ती पूर्ण भरून, मुलाखतीच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये (Army, Navy and Air Force Recruitment) अधिकारी पदावर भरती (Officer Post Recruitment) होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस.एस.बी. (SSB) कोर्स योजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण (Free training), निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.

परदेशी नोकरी घालवणाऱ्या मॅडर्न शिक्षण संस्थेची चौकशी करा; युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवरून SSB-६३ कोर्ससाठी प्रवेशपत्रत्यासोबतची कागदपत्रे डाउनलोड करून ती पूर्ण भरून, मुलाखतीच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता -

उमेदवाराने कंबाईंड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स अकेडमी एक्झामिनेशन(NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण, तसेच सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्रता प्राप्त केलेली असावी. एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडसह उत्तीर्ण, आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून यस एस एस बी SSB साठी शिफारस मिळालेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी SSB कॉल लेटर असणे आवश्यक. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी SSB कॉल लेटर किंवा शिफारस यादीत नाव असलेले असावे.