शिक्षक भरतीच्या जाहिरातीला २८ डिसेंबरचा मुहूर्त ? 

शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एसटी संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत. 

शिक्षक भरतीच्या जाहिरातीला २८ डिसेंबरचा मुहूर्त ? 
teacher recruitment advertisement news

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील बहुप्रतीक्षित व बहुचर्चित शिक्षक भरतीची जाहिरात (teacher recruitment advertisement) केव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आनंदाची बाब म्हणजे भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे आता दूर झाले असून येत्या गुरूवारी (दि.२८) डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हयातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची (Teacher vacancies)जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे,असे  शिक्षण विभागातील विश्वासीन सूत्रांनी सांगितले. परंतु, शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एसटी संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार (Candidates of ST category and Mathematics subject teacher) न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत. 

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे ३० हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खासगी अनुदानित संस्थांमधील सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत.मात्र,रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.परंतु,काही आमदारांनी रोष्टर तपासाणीबाबत आक्षेप घेतला.त्यामुळे १० टक्के जागा बाजूला ठेवून ७० टक्के पदांची जाहिरात काढणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगितले जात आहे,असे असले तरी जिल्हा परीषदेतील २० ते २१ हजार आणि खासगी संस्थांमधील १८ हजार अशा तब्बल ३८ -३९ हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : टीईटी परीक्षेचे अर्ज जानेवारीत भरा ; फेब्रुवारीत घेणार पहिली ऑनलाईन परीक्षा

शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वी २०१७ च्या सुमारे २ हजार ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली.मात्र, त्यातील केवळ ३३२ जागांसाठीच उमेदवार मिळाले.तसेच पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये एसटी संवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती देणे आवश्यक आहे.राज्यात पेसा क्षत्रे असलेल्या १३ जिल्ह्यात एसटी संवर्गाच्या सुमारे ६ हजार जागा आहेत.मात्र,राज्यात त्यासाठी केवळ अडीच हजार उमेदवार उपलब्ध असल्याचे शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारी वरून आढळून आले आहे.त्याचप्रमाणे गणित विषयात टीईटी उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याने या जागा सुध्दा रिक्त राहत आहेत,असेही सूत्रांनी सांगितले.

भरतीतील कोणता अडथळा दूर झाला ? 

सुमारे महिनाभारांपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार होती.मात्र,ग्रामविकास विभागाकडून अंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तरीही काही किरकोळ कामे पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या वगळून दोन दिवस जिल्हा परिषदांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.त्यामुळे मंगळवार व बुधवार गेल्यानंतर गुरूवार दिनांक २८ डिसेंबरपर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे,असेही सूत्रांनी सांगितले.