विद्यापीठाकडून अमृत महोत्सवानिमित्त ७५ मान्यवरांचा सत्कार 

कुलगुरू डॉ. गोसावी यांनी अमृत उद्यान निर्मिती यासारख्या नैसर्गिक उपक्रमाच्या शुभारंभाने अमृत महोत्सवाच्या विविध उपक्रमाची सुरुवात होत असल्याचे सांगत उपस्थितांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

 विद्यापीठाकडून अमृत महोत्सवानिमित्त ७५ मान्यवरांचा सत्कार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. लवकरच विविध क्षेत्रातील ७५ मान्यवर व्यक्तींचा विद्यापीठातर्फे सत्कार केला जाणार असून त्यात आदर पूनावाला, डॉ.के.एच .संचेती, शमा  भाटे ,डॉ. शां. ब .मुजुमदार (aadar Poonawala, Dr. K.H. Sancheti, Shama Bhate, Dr. Sh. B. Mujumdar) अशा व्यक्तींचा समावेश असेल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी (Savitribai Phule Pune University Vice Chancellor Dr. Suresh Gosavi ) यांनी गुरूवारी सांगितले.

हेही वाचा : SPPU News : विद्यापीठाच्या परीक्षा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त हत्तीखाना सरोवराजवळ ७५ आयुर्वैदिक वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी डॉ.सुरेश गोसावी बोलत होते.या कार्यक्रमास  प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार,विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.रवींद्र शिंगणापूरकर ,राजेंद्र विखे पाटील, डॉ.देविदास वायदंडे, डॉ.डी. बी. पवार,संदीप पालवे, सागर वैद्य, बागेश्वरी मंठाळकर तसेच  अधिसभा सदस्य,शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अमृत उद्यान निर्मिती उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले.

कुलगुरू डॉ. गोसावी यांनी अमृत उद्यान निर्मिती यासारख्या नैसर्गिक उपक्रमाच्या शुभारंभाने अमृत महोत्सवाच्या विविध उपक्रमाची सुरुवात होत असल्याचे सांगत उपस्थितांना अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यापीठाने अमृत महोत्सवासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून समिती मार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

राजेश पांडे म्हणाले,मेरी माटी मेरा देश... सेल्फी विथ मेरी माटी... या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. विद्यापीठाने व संलग्न महाविद्यालयाकडून विद्यार्थी व प्राध्यापकांना याबाबत आवाहन करण्यात आले आहे.तसेच विद्यापीठ अनुदान आयोगानेही यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे.एक कोटी सेल्फीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

कार्यक्रमात राजेंद्र विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तर प्रफुल्ल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.