पाकिस्तानातील हिंदू कुटुंबातील मुलींनी दिला IIT इंजिनिअर्सना धक्का 

 पाकिस्तानातील हिंदू कुटुंबातील संध्या, रेश्मा, मुस्कान आणि आरती या चारही मुलींचे वय 9 ते 12 वर्षे दरम्यान आहे.

पाकिस्तानातील हिंदू कुटुंबातील मुलींनी दिला  IIT इंजिनिअर्सना धक्का 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पाकिस्तानातील हिंदू कुटुंब (Hindu family in Pakistan) तिथल्या जातीय हिंसाचाराला घाबरून भारतात निर्वासित म्हणून राहू लागते . या गरीब कुटुंबातील चार शालेय मुली दिल्लीच्या IIT संस्थेच्या टेक- फेस्ट मध्ये (Four school girls at Delhi's IIT Institute Tech-Fest)सहभागी होतात. या मुलींचा फेस्ट मधील परफॉर्मन्स पाहून या संस्थेतील भावी इंजिनिअर्स देखील चाट पडतात. आयआयटी दिल्लीच्या टेक फेस्ट ट्रिस्ट-2024 (Delhi's Tech Fest TRIST-2024)मध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानमधील चार हिंदू निर्वासित विद्यार्थिनींनी आपल्या कौशल्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

 पाकिस्तानातील हिंदू कुटुंबातील संध्या, रेश्मा, मुस्कान आणि आरती या चारही मुलींचे वय 9 ते 12 वर्षे दरम्यान आहे. या सर्व इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थीनी  आहेत. टेक फेस्टमध्ये देशभरातील अभियंत्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे. या विद्यार्थिनीही त्यांच्या रोबोटसह दिल्लीच्या टेक फेस्ट ट्रिस्ट-2024 मध्ये पोहोचल्या. 

या फेस्टमध्ये फक्त अभियंतेच त्यांचे रोबोट सहभागी होऊ शकतात. मात्र काही प्रकरणांमध्ये, इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना देखील सहभागी होण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे या निर्वासित विद्यार्थिनींना ही मान्यता मिळणे सोपे नव्हते. त्यांना निश्चित मानकांची पूर्तता करावी लागली आणि इतर मुलांशी स्पर्धाही करावी लागली. आयोजकांची खात्री पटल्यानंतर त्यांना फेस्टमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. या विद्यार्थिनींनी बनवलेला ग्रिपर बॉट हा रोबोट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

 या चारही मुलींचे कुटुंब पाकिस्तानातील सिंध प्रांतात सायकल पंक्चर वगैरे दुरुस्त करण्याचे काम करायचे. धार्मिक छळाच्या भीतीने हे कुटुंब काही काळापूर्वी पाकिस्तान सोडून भारतात आले आणि जोधपूरमध्ये स्थायिक झाले. जोधपूरच्या NGO सेवा न्याय उत्थान फाऊंडेशनच्या मदतीने या मुलींचे शिक्षण सुरु आहे. या संस्थेच्या मदतीनेच या मुली टेक- फेस्ट मध्ये सहभागी झाल्या.