एमीपीएससीचा नवीन पॅटर्न २०२५ पासून

एमीपीएससीचा नवीन पॅटर्न २०२५ पासून

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणा-या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर दिलासा मिळाला. युपीएससीच्या धरतीवर स्वीकारण्यात आलेला  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ सालापासून लागू करण्यात यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास काराणाा-या विद्यार्थ्यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व यांनी एमीपीएससीला केली होती. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई-पुण्यासह राज्यभरात केलेल्या आंदोलनांची दखल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांना मागणी  मान्य करण्यात आली.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलण्यात आलेला पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील टिळक चौकात उतरून धरणे आंदोलन केले. मागणी मान्य होत नाही तरी तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला.शेवटी शासनाला विद्यार्थ्यांची दाखल घ्यावी लागली. 

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा नियोजित वेळेत घेतल्या जात नाहीत. तसेच निकाल जाहीर करण्यासही विलंब केला जातो. त्यामुळे वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांना एकच परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. परीक्षेचा ठरवून दिलेला पॅटर्न अचानक बदलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुपर्यायी प्रश्नांऐवजी आता वर्णनात्मक लेखी स्वरूपातील प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यावी याबाबतचे अधिकार आयोगाला असले तरी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आयोगाने 2023 ऐवजी 2025 पासून बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा घ्यावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात होती . त्यात काही राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतली होती .
     केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्णनात्मक परीक्षा पद्धती लागू केले आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांना एमपीएससी बरोबरच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुद्धा करता येऊ शकतो. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेतली जाईल, असा विचार करून परीक्षेची तयारी केली. विद्यार्थ्यांकडे या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक वर्ष केलेल्या अभ्यासावर पाणी फेरले जाणार होते.