बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरू ; २१०० पदांसाठी भरती

बँक ऑफ इंडियाच्या रायगड येथील झोनल ऑफिससाठी सुद्धा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अर्ज जमा करण्याची शेवटीची तारीख ही २० डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी पोस्टाद्वारे अर्ज करायचा आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरू ; २१०० पदांसाठी भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India) बंपर भरती सुरू (recruitment begins) झाली असून ही भरती प्रक्रिया थेट ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager) या पदासाठी आहे. एकूण २१००  जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची  शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२३ आहे.

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणा-या उमेदवारांना  idbibank.in या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. वेबसाईटवर भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना १ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तर  एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी २०० रूपये शुल्क आकारण्यात येणार  आहेत.

हेही वाचा : कॅम्पस प्लेसमेंट : कोणाला मिळाले ३.७ कोटी रुपयांचे पॅकेज

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इच्छूक  उमेदवाराचे वय २० पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यामध्ये फक्त आरक्षणामध्ये येणाऱ्या उमेदवारांना खास सवलत देण्यात आली आहे.

या शिवाय बँक ऑफ इंडियाच्या रायगड येथील झोनल ऑफिससाठी सुद्धा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अर्ज जमा करण्याची शेवटीची तारीख ही २० डिसेंबर २०२३ आहे. या पदासाठी पोस्टाद्वारे अर्ज करायचा आहे.  बँक ऑफ इंडिया, झोनल मॅनेजर, रायगड झोनल ऑफिस, एसटी स्टँड समोर, अलिबाग जिल्हा रायगड 402201  या पत्यावर अर्ज कराता येईल आहे.