स्पर्धा परीक्षा: संधी आणि आव्हाने : मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने परिसंवादाचे आयोजन 

परिसंवादात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे आणि राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. 

स्पर्धा परीक्षा: संधी आणि आव्हाने : मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीने परिसंवादाचे आयोजन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University and Samarth Yuva Foundation) वतीने "स्पर्धा परीक्षा: संधी आणि आव्हाने" (Competitive Examination Opportunities and Challenges) या विषयावर येत्या 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे आणि राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. 

स्पर्धा परीक्षांची तयारी करून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. अशा तरूण पिढीला संधी सोबतच नेमकी या वाटेवरची आव्हाने काय आहेत; याची जाणीव होणे आवश्यक आहे. यावरही परिसंवादात चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या किंवा करण्याचा विचार करत असलेल्या सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती राहावे, असे आवाहन समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी केले आहे.

 राजेश पांडे म्हणाले, पुणे शहराकडे स्पर्धा परीक्षांचे हब म्हणून पाहिले जाते .येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्थेपासून अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.मात्र, या विद्यार्थ्यांना पालिकेच्या मदतीने किंवा सीएसआरच्या माध्यमातून काही सुविधा उपलब्ध करून देता येतील याचाही प्रयत्न केला जाईल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते .त्यामुळे रविवारी स्पर्धा परीक्षा: संधी आणि आव्हाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.