..अन्यथा तलाठी भरती आचारसंहितामध्ये अडकणार; पेसा क्षेत्र जिल्ह्यांतील उमेदवारांमध्ये भिती 

सामान्य प्रशासन विभाग आणि महसूल विभाग यांच्यातील समन्वय अभावामुळे 13 पेसा क्षेत्र जिल्ह्यांच्या निवड याद्या प्रलंबित आहेत

 ..अन्यथा तलाठी भरती आचारसंहितामध्ये अडकणार; पेसा क्षेत्र जिल्ह्यांतील उमेदवारांमध्ये भिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department) आणि महसूल विभाग (Department of Revenue) यांच्यातील समन्वययाच्या अभावामुळे 13 पेसा क्षेत्र जिल्ह्यांच्या (13 pesa area districts) निवड याद्या प्रलंबित आहेत. यांद्याची प्रक्रिया मार्च अमहिन्यांपूर्वी पूर्ण न झाल्यास लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेत ही भरती अडकू शकते.अशी भिती पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी (Talathi Recruitment Candidates) व्यक्त केली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता (code of conduct) लागू होण्याची शक्यता केंद्रीय निवडणुक आयोगाने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर  लवकरात लवकर निवड याद्या जाहीर कराव्यात,अशी अपेक्षा उमेदवरांकडून व्यक्त केली जात आहे.  

तलाठी भरती परीक्षा ३ भागात एकूण ५७ सत्रामध्ये घेण्यात आली आहे. त्यानंतर महाभूमिविभागातर्फे दिनांक 23 जानेवारीला 23 जिल्ह्यांची निवड जाहीर करण्यात आली. मात्र उर्वरित 13 पेसा क्षेत्र जिल्ह्यांची भरती प्रक्रिया रखडली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (pesa कायदा लागू) 17 संवर्ग सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने दाखल याचिकेच्या निर्णयाच्या आधीन राहून सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील निर्देशानंतर 13 जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर केल्या जाणार असल्याचे महाभूमिकडून सांगण्यात आले.

शासनाने फक्त न्यायप्रविष्ट प्रवर्गातील निकाल राखीव ठेवून बाकी प्रवर्ग उदा . उमेदवारांचा निकाल घोषित केला आहे. वनरक्षक निकालाबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जातीने लक्ष दिल्यामुळे पेसा क्षेत्रातील निकाल लागले आहेत. याचप्रमाणे महसूल मंत्री विखे पाटील साहेबांनी लक्ष देऊन भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी तलाठी भरती उमेदवारांनी केली आहे. 

"पेसा जिल्ह्यातील इतर भरतीचे निकाल लागत आहेत. मात्र तालाठी भरतीचे निकाल लागत नसल्यामुळे 13 जिल्ह्यातील निकाल रखडल्यामुळे तलाठी भरती विद्यार्थी नैराश्यातून जात आहे. शासनाने लवकरात लवकर निवड यादी जाहीर करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ द्यावे. मार्च महिना अखेरपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण न झाल्यास, ती आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने त्वरित लक्ष देऊन 13 पेसा क्षेत्र जिल्ह्यांच्या निवड याद्या लवकरात लवकर जाहीर कराव्यात. 


-पितांबर येरुणकर, तलाठी भरती,  उमेदवार