महाज्योती, सारथी, बार्टीच्या पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्या; संग्राम जगताप 

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे राज्यातील महाज्योती, सारथी, बार्टी मार्फत पी.एच.डी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अटी व शर्ती शिथिल करुन पात्र उमेदवारांना शिष्यवृत्ती देण्यात यावी,

महाज्योती, सारथी, बार्टीच्या पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती द्या; संग्राम जगताप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे राज्यातील महाज्योती, (Mahajyoti) सारथी, (Sarthi) बार्टी (Barty) मार्फत पीएच.डी चे (P. hd Students) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अटी व शर्ती शिथिल करुन पात्र उमेदवारांना (Eligible candidates) शिष्यवृत्ती (scholarship) देण्यात यावी, अशी मागणी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shine) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

महाराष्ट्रातील महाज्योती, सारथी व बार्टी यांच्या माध्यमातून शैक्षणिक  वर्ष २०२२-२३ मधील पी.एच.डी. करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी उपोषण करीत आहेत. सर्व गोष्टींची पाहाणी करुन पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी  दिनांकापासून सरसकट शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार निलेश लंके यांनीही पत्राद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली आहे. 

विद्यार्थ्यांना होणारा शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास विचारात घेता महाज्योती, सारथी, बार्टी मार्फत सन २०२२-२३ मध्ये पी.एच.डी करणाऱ्या सर्व अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रता परीक्षा रद्द करुन नोंदणी दिनांकापासून सरसकट शिष्यवृत्ती देण्याबाबत योग्य तो निर्णय तात्काळ  घ्यावा, अशी विनंती आमदार जगताप यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यामुळे येत्या काळात तरी या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणार का ? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.