CUET UG 2024 ॲडमिट कार्ड सोमवारी रात्री प्रसिद्ध होणार 

CUET UG 2024 ची परीक्षा 15 मे 2024 पासून हायब्रीड पद्धतीने सुरू होईल. ही परीक्षा 15 मे ते 18 मे 2024 या कालावधीत पेन आणि पेपर पद्धतीने आणि 21 मे ते 24 मे 2024 या कालावधीत सीबीटी पद्धतीने घेतली जाईल.

CUET UG 2024 ॲडमिट कार्ड सोमवारी  रात्री प्रसिद्ध होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

CUET UG 2024 हॉल तिकीट (Hall Ticket) सोमवारी (दि.13 ) रात्री Exams.nta.ac.in/CUET-UG/ या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने दिली आहे. उमेदवार हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करू शकतील. 

NTA ने प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार  CUET UG 2024 प्रवेशपत्र सोमवारी रात्री Exams.nta.ac.in/CUET-UG/ येथे उपलब्ध करून दिले जाईल. नोंदणीकृत उमेदवार NTA CUET हॉल तिकीट 2024 प्रकाशित झाल्यावर ऑनलाइन डाउनलोड करू शकतील. CUET ॲडमिट कार्ड 2024 PDF ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना लॉगिन क्रेडेंशियल प्रविष्ट करणे आवश्यक आहे. CUET UG 2024 ची परीक्षा 15 मे 2024 पासून हायब्रीड पद्धतीने सुरू होईल. ही परीक्षा 15 मे ते 18 मे 2024 या कालावधीत पेन आणि पेपर पद्धतीने आणि 21 मे ते 24 मे 2024 या कालावधीत सीबीटी पद्धतीने घेतली जाईल. NTA लवकरच CBT मोडसाठी CUET 2024 परीक्षा सिटी स्लिप जारी करेल,अशी अपेक्षा आहे. 


असे जरा हॉल तिकीट डाउनलोड 


* CUET 2024 वेबसाइट  cuetug.ntaonline.in  ला भेट द्या 

* CUET 2024 अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि सुरक्षा पिन प्रविष्ट करा

* 'लॉग इन' वर क्लिक करा 

* परीक्षा केंद्र शहर वाटपासाठी आगाऊ सूचना' टॅबवर क्लिक करा.

* PDF डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट घ्या