शाळांना बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा मेल ; २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी , पालकांची पळापळ 

२६/११ आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा स्फोट घडवण्यात येत असल्याचे मेल मध्ये म्हटले आहे. या मेल मुळे शहरभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शहरातील सर्व शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून पालकांना शाळेतून मुलांना घरी  घेऊन जाण्याचे निरोप दिले आहेत.

शाळांना बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा मेल ; २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी , पालकांची पळापळ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

mail bomb blasts in schools : कर्नाटकची राजधानी बंगळुरू (Bangalore is the capital of Karnataka) शहरातील २८ शाळांमध्ये बॉम्ब ठेवले असून लवकरच त्याचा स्फोट होईल, अशा स्वरूपाचे मेल शहरातील शाळांना मिळाले आहेत. मुंबई येथील २६/११ आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर (repeating the 26/11 attacks) हा स्फोट घडवण्यात येत असल्याचे मेल मध्ये म्हटले आहे. या मेल मुळे शहरभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शहरातील सर्व शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून पालकांना शाळेतून मुलांना घरी  घेऊन जाण्याचे निरोप दिले आहेत.

शुक्रवारी (दि.१ )सकाळी ११. ३० च्या दरम्यान काही शाळांना शाळेच्या आवारात बॉम्ब प्लांट केल्याचे मेल आले होते, या शाळांनी पोलिसात याविषयी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या शाळांची तपासणी सुरु केली. सुरुवातीला १२ शाळांना मेल आल्याची माहिती होती. दुपार पर्यंत हा आकडा २८ वर पोहोचला होता.

हेही वाचा : शासकीय व खासगी शाळांसाठी ६६ कोटींची पारितोषिके; ४५ दिवसांच्या उपक्रमांतून ठरणार स्पर्धेचा निकाल

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत सांगितले , "कर्नाटक पोलीस या संदर्भात सर्व खबरदारीचे उपाय करत आहेत. पालकांनी घाबरून जायचे कारण नाही. ज्या शाळांना धमकीचे मेल येत आहेत, त्या शाळांमधून विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्व शाळांची कसून तपासणी सुरु आहे."  दरम्यान, सायबर सेल हा मेल कुठून आला आहे, याचा शोध घेत आहेत.