शिक्षकांसाठी मोठी बातमी : आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील 

३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.येत्या ६ डिसेंबरपर्यंत पात्र शिक्षक बदलीसाठी अर्ज करू शकतील.

शिक्षकांसाठी मोठी बातमी :  आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्याच्या ग्रामविकास विभागाने (Rural Development Department) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना (Zilla Parishad Inter District Transfers of Primary Teachers) हिरवा कंदील दिला आहे. ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन (Online)संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.येत्या ६ डिसेंबरपर्यंत पात्र शिक्षक बदलीसाठी अर्ज करू शकतील.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे केल्या जातात. जे शिक्षक बदलीस पात्र आहेत.त्यांच्याकडून आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते.परंतु ही प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक अंतरजिल्हा बदली मिळण्यास पात्र असूनही रिक्त जागेआभावी त्यांना बदली मिळाली नव्हती, अशा शिक्षकांना २०२२ मध्ये भरलेला अर्ज एडिट करण्याची संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा : शासकीय व खासगी शाळांसाठी ६६ कोटींची पारितोषिके; ४५ दिवसांच्या उपक्रमांतून ठरणार स्पर्धेचा निकाल

न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडे अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना अर्ज करण्याची संधी दिली जावी तसेच असे करताना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन किंवा विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करावी. येत्या ६ डिसेंबरपर्यंत पात्र शिक्षक बदलीसाठी अर्ज करू शकतील. त्यानंतर बादलीची कार्यवाही केली जाणार आहे. याबाबातच्या आवश्यक सूचना संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी,असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.