'PARAKH' च्या पहिल्या राज्य शैक्षणिक सर्वेक्षणाकडे राज्यांनी फिरवली पाठ

सर्वेक्षणात देशभरातील  तीन लाख शाळांमधील अंदाजे ८० लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात ६ लाख शिक्षक आणि ३ लाखांहून अधिक प्रादेशिक अन्वेषकांचाही समावेश आहे.

'PARAKH' च्या पहिल्या राज्य शैक्षणिक सर्वेक्षणाकडे राज्यांनी फिरवली पाठ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

NCERT च्या 'परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड अॅनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट' (PARAKH) द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाकडे बिगर भाजप (BJP) शासित राज्यांनी पाठ फिरवली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ  इव्हॅल्युएशन रेग्युलेटरी अथॉरिटी (AICTE) ने पहिले राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षण केले. त्यात दिल्ली आणि पश्चिम बंगालसह बिगर भाजप पक्षांची सत्ता असलेल्या पाच राज्यांनी सहभाग घेण्यास नकार दिला आहे.

 

या सर्वसमावेशक सर्वेक्षणात देशभरातील  तीन लाख शाळांमधील अंदाजे ८० लाख विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात ६ लाख शिक्षक आणि ३ लाखांहून अधिक प्रादेशिक अन्वेषकांचाही समावेश आहे. दि. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या या सर्वेक्षणात भारतातील ब्लॉक स्तरावर इयत्ता तिसरी, सहावी,  आणि नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक क्षमतांचे मूल्यांकन करण्यात आले होते. 

 

राष्ट्रीय मूल्यांकन नियामक परिक्षाने केलेल्या पहिल्या राज्य शैक्षणिक उपलब्धी सर्वेक्षणात दिल्ली आणि पश्चिम बंगालसह छत्तीसगड, राजस्थान, पंजाब आणि ओडिशा या बिगर-भाजप पक्षांची सत्ता असलेली पाच राज्ये आढळली नाहीत, अशी माहिती पीटीआय ने दिलेल्या वृत्तात देण्यात आली आहे. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO