बारावीचा निकाल मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता

राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले जाते. आज रविवार असल्याने राज्य मंडळाला सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी दि.20 मे रोजी निकाल जाहीर होणार नाही.

बारावीचा निकाल मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)इयत्ता बारावीचा निकाल (12th Exam Result)20 मे पर्यंत जाहीर होईल,असा अंदाज बांधला जात होता.मात्र,बारावीच्या निकालासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार असून बारावीचा निकाल मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे निकालाच्या तारीखेच्या प्रतीक्षेत (result date)असलेल्या विद्यार्थी व पालकांची उत्सुकता आणखी काही दिवस ताणली जाणार आहे.

Breaking News: बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार; बोर्डाची अधिकृत घोषणा

राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होईल,असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी व पालकांकडून विचारणा होत आहे. मात्र, राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी प्रसिध्दी पत्रक प्रसिद्ध केले जाते. आज रविवार असल्याने राज्य मंडळाला सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी दि.20 मे रोजी निकाल जाहीर होणार नाही. राज्य मंडळाच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे.तसेच अद्याप निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

बारावीचा निकाल येत्या 21 किंवा 22 मे रोजी जाहीर केला जाऊ शकतो. पुढील दोन दिवसात निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे पुढील दोन दिवसात निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी निकाल जाहीर होणार असेल तर राज्य मंडळाकडून सोमवारी अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले जाईल. तसेच बुधवारी निकाल जाहीर होणार असेल तर मंगळवारी पत्रक प्रसिध्द होईल. त्यामुळे राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.