शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द होण्याची प्रक्रिया माहिती आहे का? शिक्षणाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

शिक्षक भरतीसाठी संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दि. १६ ऑक्टोबर पासून देण्यात आलेली आहे.

शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द होण्याची प्रक्रिया माहिती आहे का? शिक्षणाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) शिक्षक भरतीसाठी (Teachers Recruitment) स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात प्रसिध्द करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण शैक्षणिक संस्थांना परस्पर जाहिराती प्रसिध्द करता येणार नाहीत. त्यासाठी आधी बिंदुनामावली, रिक्त पदे, आरक्षण, अतिरिक्त शिक्षक आदी बाबींची काटेकोर तपासणी करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. त्यांच्या मान्यतेनंतर जाहिरात प्रसिध्द करता येणार आहे. (Advertisement for Teachers Recruitmnet)

 

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी याबाबत सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी अशा सर्व संबंधितांना याबाबतचा सुचना दिल्या आहेत. शिक्षक भरतीसाठी संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दि. १६ ऑक्टोबर पासून देण्यात आलेली आहे. जाहिरात देण्यासाठी आवश्यक असणारे युजर मॅन्युअल व सुचना पोर्टलवर देण्यात आलेल्या आहेत. २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्त शिक्षक पदांची मागणी पोर्टलवर करावी लागणार आहे.

पुण्यात 'बी' दर्जाच्या शाळांची संख्या सर्वाधिक

 

स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदूनामावली सहायक आयुक्तांकडून प्रमाणित करून धेणे अनिवार्य आहे. पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची आहे. या व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी संस्था ज्या जिल्ह्यामध्ये नोंदणी झालेली आहे, त्या जिल्ह्याचे संबंधित शिक्षणाधिकारी यांनी पोर्टलवरील जाहिरातीस परवानगी देण्याची जबाबदारी आहे. पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी बिंदूनामावली मान्य करून घेणे आणि बिंदूनामावली मान्य झाल्यानंतर गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती करून घेणे अशा दोन टप्प्यांत कार्यवाही करावी लागणार आहे.

 

पोर्टलवर अशी होईल प्रक्रिया

संस्थेने बिंदूनामावली पोर्टलवर भरून संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे फॉरवर्ड केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर येईल. त्यानंतर शिक्षणाधिकारी पोर्टलवर व्यवस्थापनाने अपलोड केलेली बिंदुनामावलीची प्रत डाऊनलोड करून प्रमाणित बिंदुनामावालीमध्ये नोंद असलेली पदे तसेच संस्थेने पोर्टलवर नोंद केलेली आरक्षणाची रिक्त पदे व संख्या योग्य याची खात्री करून पोर्टलवर भरलेली बिंदूनामावलीची माहिती मान्य (Approve) करतील.

 

पोर्टलवर बिंदूनामावली मान्य (Approve) केल्यानंतरच संबंधित व्यवस्थापनास गट व विषयनिहाय रिक्त पदाची माहिती भरता येईल. अशी भरलेली माहिती संबंधित शिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर उपलब्ध झाल्यानंतर भरलेल्या माहितीमध्ये विषयाचे शिक्षक अतिरिक्त नसल्याची खात्री करुन संबंधित व्यवस्थापनाची विषयनिहाय माहिती मान्य (Approve) करता येईल. संबंधित विषयांचे शिक्षक अतिरिक्त असल्यास संबंधित व्यवस्थापनाने भरलेली विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कारणासह संबंधित शिक्षणाधिकारी अमान्य (Reject) करतील. अतिरिक्त शिक्षक असल्याने नाकारलेली पदे वगळून संस्था पुन्हा गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरून पुन्हा संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे ऑनलाईन पाठवतील. त्यानंतर भरलेली माहिती योग्य असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी मान्य (Approve) करतील.

शालार्थ आयडी : शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, आठवड्याभरात प्रस्तावावर निर्णय

 

आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदे या दोन्ही प्रकारची माहिती मान्य (Approve) झाल्यानंतर संबंधित संस्थेच्या लॉगीनवर जाहिरात जनरेट (Generate Advertisement) करण्याची सुविधा आहे. या सुविधेचा वापर करुन व्यवस्थापन जाहिरात जनरेट करु शकतील. संबंधित व्यवस्थापनाची जाहिरात जनरेट झाल्याशिवाय उमेदवारांचे प्राधान्यक्रम संबंधित व्यवस्थापनास येणार नाहीत. त्यामुळे बिंदुनामावली, गट व विषयनिहाय रिक्त पदांची अशी दोन्ही माहिती मान्य (Approve) झाल्यानंतर जाहिरात जनरेट करणे आवश्यक राहील.

 

खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती असे दोन पर्याय आहेत. खाजगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील. तर स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र मुलाखतीशिवाय पदभरती हा एकच पर्याय निवडणे बंधनकारक आहे, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k