'झेडपी'चे शिक्षक होत आहेत स्मार्ट; प्रशिक्षित शिक्षक, शाळांना दिली डिजिटल साधने

कम्युटेशनल थिकिंग आणि ब्लॉक बेस्ड कोडींग च्या माध्यमातुन शिक्षकांना २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्य शिकवणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश होते.

'झेडपी'चे शिक्षक होत आहेत स्मार्ट; प्रशिक्षित शिक्षक, शाळांना दिली डिजिटल साधने

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Computer Science Teaching Excellence : पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग, अमेझॉन फ्युचर  इंजिनिअर (AFE) व लीडरशिप फॉर इक्विटी (LFE) यांच्या संयुक्त विद्यमाने खास शिक्षकांसाठी 'कॉम्प्युटर सायन्स टिचिंग एक्सलन्स  प्रोग्राम' घेण्यात आला होता. या कार्यक्रमात यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेल्या ८० शिक्षकांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रम राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला होता. कम्युटेशनल थिकिंग आणि ब्लॉक बेस्ड कोडींग च्या माध्यमातुन शिक्षकांना २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्य शिकवणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश होते. या माध्यमातून शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक विज्ञानातील नवीन संकल्पना, आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. 

सूरज मांढरे यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना दणका; अनधिकृत शाळाप्रकरणी कारवाईची तंबी, दहा दिवसांत मागविला खुलासा

प्रशिक्षण कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या पहिल्या ८० शाळांना कॉम्प्युटर लॅब, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, टॅबलेट्स, कोडिंग किट अशी डिजिटल साधने बक्षीस म्हणून देण्यात आली. सुमारे ३० लाखांची डिजिटल साधने यावेळी शाळांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. शोभा खंदारे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, अमेझॉन कमिटी एंगेजमेंट लिमिटेड च्या मनिषा पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर आदी यावेळी उपस्थित होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD