विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ठराव संकेतस्थळावर टाकणार

 विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयांची माहिती अधिसभा सदस्यांना दिली जात नाही. लेखी पत्र व्यवहार करूनही माहिती प्राप्त होत नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावा,अशी आक्रमक भूमिका आधिसभा सदस्यांनी घेतली.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे ठराव संकेतस्थळावर टाकणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) व्यवस्थापन परिषदेच्या (Management Council ) बैठकीत घेतले जाणारे निर्णय नेहमीच गुलदस्त्यात ठेवले जातात. त्याबाबत अधिसभा सदस्यांना कोणती माहिती मिळत दिली जात नाही.यावर सदस्यांनी रविवारी सभागृहात तिव्र नाराजी व्यक्त केली. तसेच व्यवस्थापन परिषदेचे सर्व निर्णय संकेतस्थळावर प्रसिद्ध (published on the website) करण्यात यावे, अशी मागणी केली. या मागणीस विद्यापीठ प्रशासनातर्फे मान्यता दिली जात असल्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (dr. Suresh Gosavi Vice Chancellor of SPPU) यांनी जाहीर केले.परिणामी विद्यापीठाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येणार आहे.  

हेही वाचा : विद्यापीठाचे परीक्षा केंद्र बनले कॉपी सेंटर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेचे कामकाज पार पडले. अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत केल्या जाणाऱ्या कामकाजात पारदर्शकता असावी, यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सर्व निर्णय वेबसाईटवर टाकावेत, अशी मागणी केली. सुरवातीला व्यवस्थापन परिषदेत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले. त्यावर आधिसभा सदस्यांनी गोधळ घातला. त्यानंतर येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीपासून पुढील सर्व बैठकांमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.

 विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयांची माहिती का लपवली जाते. ही माहिती अधिसभा सदस्यांना का दिली जात नाही.लेखी पत्र व्यवहार करून ही माहिती प्राप्त का होत नाही. माहिती अधिकार कायद्यानुसार ही माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावा,अशी आक्रमक भूमिका आधिसभा सदस्यांनी घेतली. त्यानंतर कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी विद्यापीठाच्या निर्णयांची माहिती सर्वांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाच्या आधिसभा सदस्यांकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांकडून ही मागणी केली जात होती, अखेर त्यास मंजुरी मिळाली आहे.