व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार थांबणार का? युवासेना आक्रमक

यादव यांनी तंत्रशिक्षण संचालनालय तसेच राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार थांबणार का? युवासेना आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात बहुतांश विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण (Admission 2023) घेण्यासाठी इच्छुक असताना अनेक महाविद्यालये मात्र बेधडक शैक्षणिक भ्रष्टाचार करत आहेत. राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) एकूण प्रवेशांचे निकष नेमून दिले आहेत. या नियमांना केराची टोपली दाखवून महविद्यालय संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप युवासेना सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी केला आहे.  

यादव यांनी तंत्रशिक्षण संचालनालय तसेच राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्याचे सिद्ध झाल्यास सर्व प्रवेश, प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या स्तरावर रद्द करण्यात येतील, अशी सुचना महाविद्यालयांना देण्यात यावी, अशा सुचना तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना दिल्याची माहिती यादव यांनी दिली.    

हे जरा जास्तच झालंय! विद्यापीठ कायद्यात बदल करून राज्यपालांना कारवाईचे अधिकार देणार

यादव म्हणाले, CET सेल च्या निकषानुसार संस्थास्तरावरील कोट्यातील प्रवेश हे कॅप राउंड नंतर होणे बंधनकारक आहे. तसेच दोन्ही कॅप राउंड चा निकाल अर्थात निवड यादी संबंधित महाविद्यालयाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आणि महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. प्रथम कॅप फेरी पूर्ण झालेली नसतांना पुणे शहरातील नामांकीत महाविद्यालय मात्र संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया बेसुमार डोनेशन घेत राबवत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवेश दिल्याचे निदर्शनास आले असल्याचे देखील यादव यांनी सांगितले.

राज्य सामयिक परीक्षा कक्षाने प्रसिद्ध केलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या माहिती पुस्तिकेत सर्व नियम देण्यात आले आहे. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था पुर्णवेळ व्यावसायिक पदवी पूर्व तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशांचे विनियमन पोट नियम क्रमांक १३ तसेच सुधारीत नियमांमध्ये  केंद्रिभुत प्रवेश प्रक्रियेनंतर राहिलेल्या रिक्त जागा व संस्थास्तरावरील प्रवेश विनाअनुदानित संस्थेतील संचालक किंवा प्राचार्य यांनी या जागांकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्याची पद्धत निश्चित करण्यात आलेली आहे. निकषानुसार मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश हे कॅप राऊंडनंतरच होणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या केलेले सर्व प्रवेश अवैध ठरतात, त्यामुळे हे प्रवेश रद्द करण्याची विनंती आम्ही तंत्रशिक्षण संचालनालय तसेच राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांना केली होती, त्यानुसार त्यांनी तातडीने सूचना जारी केल्या आहेत, असे यादव यांनी सांगितले.

अजूनही अनेक महाविद्यालये या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून प्रवेश करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे या महाविद्यालयांना आज निवेदन देऊन आम्ही हा भ्रष्टाचार थांबवण्याची विनंती केली आहे. पण तरी देखील हा भ्रष्टाचार चालू राहिला तर युवासेना सर्व पातळीवर यावर लढाई लढून सामान्य होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल. त्यामुळे महाविद्यालयांनी दक्ष असावे, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD