हिप हिप हुर्रे...शाळेच्या शेवटच्या दिवशी रिक्षावाले काकांनी दिला मुलांना सुहृदयी निरोप ...

आजपर्यंत या काकांनी केलेली मदत अनेक मुलांनी आपापल्या मनोगतातून सांगितली.काही मुले तर व्यक्त होताना ढसाढसा रडली.

हिप हिप हुर्रे...शाळेच्या शेवटच्या दिवशी रिक्षावाले काकांनी दिला मुलांना सुहृदयी निरोप ...

पुणे : खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयात (Sunderbai Marathe School)आज शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस.वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर ..सगळे मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटून उन्हाळी सुट्टीच्या शुभेच्छा देत होते.. .मोठ्या उत्साहात आनंदात ..वर्ष भर ज्या मुलांची नियमित व  सुरक्षितपने वाहतूक करणारे रिक्षावाले काका भाऊसाहेब गट, खंडू तेलंगे, रमेश माने, प्रदीप झांबरे,नामदेव टिळेकर, भीमराव  गवारे, सखाराम मोरे या रिक्षा व व्ह्यन चालकांनी (Rickshaw uncle)शाळा प्रशासन,शिक्षक यांना  एकत्र घेऊन शाळेतील मुलाना खाऊ वाटप केले.तर मुलांनी सुद्धा एकत्र येऊन सर्व रिक्षा व व्हान चालकांना भेटवस्तू देऊन सुहृदयी निरोप दिला.

या छोट्या खानी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सांगताना विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले, शाळेत बालवाडी, पाहिली पासून ते दहावी पर्यंत अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी खूप दूरवरून आजू बाजूच्या परिसरातून रिक्षा आणि बस मधून ये जा करतात. त्यांच्या सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी रिक्षावाले काकांची असते.तो ही पालकांचा एकमेव विश्वास असतो. रिक्षातील मुलांना मदत करणे, वेळेत शाळेत पोहचविणे,वह्या, पुस्तके,पेन पेन्सिल घेऊन देणे,वेळ प्रसंगी घरातून आई ने डबा दिला नसेल तर त्यावेळी रिक्षा चालकांनी मुलांना खाऊ घेऊन दिलेला आहे.  

आजपर्यंत या काकांनी केलेली मदत अनेक मुलांनी आपापल्या मनोगतातून सांगितली.काही मुले तर व्यक्त होताना ढसाढसा रडली..आणि रिक्षावाले काकांनी काही वेळेस शिक्षा ही केली. घरी आई वडिलांना सांगितले की अजून शिक्षा करा,असा आदेशच  पालकांनी दिल्याचा अनुभव एका मुलानी सांगितला व त्यामुळेच मला शिस्त लागली .यामुळे शाळेतील मुले आणि रिक्षाचालक यांचे नाते घट्ट झाल्याचे जाणवले.

आज शेकडो मुलांना शाळेत वेळेत घेऊन येण्यापासून घरी वेळेत पोहचवण्याची  महत्व पूर्ण जबाबदारी या काकांनी खूप विश्वास पूरक पूर्ण केल्याचा अनुभव शिक्षकांनी सांगितला.. शेवटी हीप हिप हुर्रे  हिप हिप हुर्रे घोषणा  देऊन मुले आपापल्या रिक्षा चालकांच्या रिक्षा मध्ये बसून सुखरूप घरी पोहचले. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील मुख्याध्यापक संजय सोमवंशी , पर्यवेक्षक सुनील वळसे, ज्येष्ठ शिक्षक संजय हुंबे, जेम्स साखरे ,  दिपक सोनवणे , विद्या कव्हेकर,बीना साळुंखे यांनी केले..