विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळला वाव : टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात कार्यशाळा

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय येथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेलच्या अंतर्गत 'केसांची निगा व केशरचना' प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मिळला वाव : टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात कार्यशाळा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाच्या संधी मिळाल्या तर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळेल,  त्यांना स्वतःचीच स्वतःशी नव्याने ओळख होईल, या उद्देशाने खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय येथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेलच्या अंतर्गत 'केसांची निगा व केशरचना' प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या कार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत प्रशिक्षिक म्हणूनही विद्यार्थीनींनीच काम पाहिले. सर्व विद्यार्थिनींना केशरचना करण्याची संधी देण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या कार्याचे मूल्यमापनही करण्यात आले. यासाठी महाविद्यालयातील प्रा.गौरी माटेकर, प्रा.अर्चना तारू, प्रा.ज्योती वाघमारे आणि प्रा. योगिता झोपे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कु. संध्या इंगोले, कु. भुमी नलावडे,कु.रिता यादव, कु. नम्रता कांबळे यांच्या केशरचना उत्कृष्ट म्हणून गौरवण्यात आल्या.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अरुण शेलार यांनी "तुमच्या आवडीलाच तुम्ही तुमचे जीवन निर्वाहाचे साधन बनवू शकता" असा मोलाचा सल्ला दिला.

याप्रसंगी महाविद्यालयातीलप्रा शुभांगी पाटील,प्रा मारीया,प्रा.नमीता,प्रा निरभवणे,प्रा.अस्मीता,प्रा.दिपाली,प्रा तेजस्वीनी,प्रा अमृता,प्रा कविता,प्रा प्रियांका आदी  सर्व शिक्षिकांनी आवर्जून उपस्थिती लावली. आयक्यूएससी समन्वयक प्राध्यापक राजेंद्र लेले आणि मा. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुचेता दळवी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले.