SPPU News : चुका माफ करून विद्यार्थ्यांच्या गुणांची दुरुस्ती करण्याची संधी द्यावी! प्राध्यापक संघटनेची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांना संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय दरेकर यांनी निवेदन दिले आहे.

SPPU News : चुका माफ करून विद्यार्थ्यांच्या गुणांची दुरुस्ती करण्याची संधी द्यावी! प्राध्यापक संघटनेची मागणी
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (SPPU) संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी (Professor) परीक्षांशी संबंधित सर्व कामकाज प्रामाणिकपणे केले. मात्र, संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या (Students) गुणांची नोंद करताना अनवधानाने काही त्रुटी राहिल्या अथवा चुका झाल्या, त्या दुरुस्त करण्याची संधी त्यांना नाकारून विद्यापीठ प्रशासन अन्याय करत आहे. त्यामुळे विद्यापीठ परीक्षेचे काम वेळेत आणि गुणवत्तेचे करण्यासाठी आपण उदार मनाने या चुका माफ करून संकेतस्थळावर गुणांची दुरुस्ती करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भारतीय इलिजिबल स्टुडंट्स अॅन्ड टीचर्स असोसिएशनने (BESTA) केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Dr. Suresh Gosavi) यांना संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय दरेकर यांनी निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अहमदनगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांनी विद्यापीठ परीक्षेचे (प्रश्नपत्रिका काढणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, विद्यापीठ संकेतस्थळावर गुणांची नोंद करणे आदी) कामकाज प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Pune News : लाच प्रकरणात इतरही अधिकारी? अभाविपचे महापालिकेसमोर आंदोलन

कोविड १९ च्या प्रभावामुळे विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे आणि विद्यापीठातील विभाग, संलग्न महाविद्यालयातील प्रवेशाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेलेले असताना ते सुरळित करण्यासाठी प्राध्यापक सहकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाने ज्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद विद्यापीठ संकेतस्थळावर नोंद करायचे राहून गेले, अशांसाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने गुणांची नोंद करण्याची संधी उपलब्ध करून दिली व हजारो विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानतो, असे निवेदनात म्हटले आहे.

मात्र, या सर्व प्रकारात ज्या प्राध्यापकांनी सर्व कामकाज प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पूर्ण केले. मात्र संकेतस्थळावर गुणांची नोंद करताना अनवधानाने काही त्रुटी राहिल्या अथवा चुका झाल्या, त्या दुरुस्त करण्याची संधी या प्रामाणिक सहकाऱ्यांना नाकारून विद्यापीठ प्रशासन अशा सहकाऱ्यांवर अन्याय करती असल्याची आमची भावना झाली आहे. या पुढील काळात प्राध्यापक सहकाऱ्यांनी विद्यापीठ परीक्षेचे काम वेळेत आणि गुणवत्तेचे करण्यासाठी आपण उदार मनाने या चुका माफ करून संकेतस्थळावर गुणांची दुरुस्ती करण्याची संधी द्यावी आणि हजारो विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय दरेकर यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo