विद्यापीठातील छपाई अर्थात मुद्रणालय विभाग बंद होणार ? 

विद्यापीठाच्या छपाई विभागावर सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्चा होतो.त्या तुलनेत या विभागाकडून कामे केली जात नाहीत.

विद्यापीठातील  छपाई अर्थात मुद्रणालय विभाग बंद होणार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)मुद्रणालय विभागावरील (printing department)खर्च आणि विभागातून होणारी कामे याचा विचार केल्यास  मुद्रणालय विभागावर होणारा खर्चा प्रचंड आहे.विद्यापीठातर्फे प्रकाशित केली जाणारी डायरी सुध्दा या विभागाने मार्च महिन्यात तयार केली.त्यामुळे सर्वच बाजूने तोट्यात चालणारा हा विभाग तातडीने बंद करा, (Close the printing section immediately)अशी मागणी अधिसभा सदस्य विनायक आंबेकर (senate member Vinayak Ambekar) यांनी केली आहे.त्यामुळे विद्यापीठाचा मुद्रणालय अर्थात छपाई विभाग बंद (Close the printing department) करण्याचा निर्णय घेतला जाणार का ?  हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या 23 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.या अधिसभेच्या बैठकीत विविध प्रस्ताव सादर केले जाणार असून अधिसभा सदस्य विनायक आंबेकर हे छपाई विभाग तातडीने बंद करावा,असा प्रस्ताव सादर करणार आहेत.

हेही वाचा : SPPU NEWS : वादग्रस्त नाटकाचा वाद पुन्हा पेटणार ? ; अधिसभेत मांडणार 'त्या' व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या निषेधाचा प्रस्ताव

विद्यापीठाचा छपाई विभाग म्हणजेच विद्यापीठ मुद्रणालय हा विभाग प्रत्यक्षात करीत असलेली कामे व त्या विभागावर होणारा खर्च याचा विचार व माहितीचे विश्लेषण केले असता या विभागावर होणारा खर्च प्रचंड व मिळणारी सेवा अत्यल्प व अनियमीत आहे, असे स्पष्ट झाले आहे. सन २०२४ ची विद्यापीठ डायरी मार्च महिन्यात या विभागाकडून तयार झाली आहे. सबब, हा तोट्यात जाणारा विभाग तातडीने बंद करण्याचा निर्णय घ्यावा व तेथील सध्याच्या सेवकांचे अन्य विभागात समायोजन करण्याची कारवाई करावी,अशी शिफारस ही सभा मा. कुलगुरू व व्यवस्थापन परिषदेला करीत आहे,असा आंबेकर यांचा प्रस्ताव आहे. 

------------------

विद्यापीठाच्या छपाई विभागावर सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्चा होतो.त्या तुलनेत या विभागाकडून कामे केली जात नाहीत.तसेच डिसेंबर महिन्यात हात मिळणारी विद्यापीठाची डायरी मार्च महिन्यात छापून पूर्ण झाली आहे.त्यामुळे असा विभाग बंद करणे उचित ठरेल. तसेच विद्यापीठाच्या उत्तरपटरिकांची छपाई हे गोपनीयतेचे काम नाही.त्यामुळे हा विभाग तातडीने बंद करावा. 

- विनायक आंबेकर , अधिसभा सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे