पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा फटका ? केवळ 10 ग्रेस गुण मिळणार 

इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना 20 ग्रेस गुण दिले जातात. मग पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांना केवळ 10 ग्रेस गुण का ?

पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा फटका ? केवळ 10 ग्रेस गुण मिळणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासानाच्या निर्णयानुसार चालू शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा (Annual examination of class V and VIII students)घेतली जाणार आहे.मात्र, या विद्यार्थ्यांना परीक्षा केवळ 10  ग्रेस गुण (Only 10 grace mark) दिले जाणार आहेत.इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना 20 ग्रेस गुण (20 grace marks for 9th and 10th students) दिले जातात. मग पाचवी,आठवीच्या विद्यार्थ्यांना केवळ 10 ग्रेस गुण का ? असा सवाल पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने (Pune District Secondary and Higher Secondary School Principals' Union)उपस्थित केला असून या विद्यार्थ्यांना सुध्दा 20 ग्रेस गुण देण्याची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.

एससीईआरटीएने शालेय परीक्षांसंदर्भात परिपत्रके प्रसिध्द केली आहेत.त्यात STARS प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) संकलित मूल्यमापन  2 व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा आयोजन याबाबत मुख्याध्यापक संघाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काही मुद्यांचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.मुख्याध्यापक संघाने नंदकूमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड व विद्यासामितीचे अध्यक्ष तबाजी वागदरे आणि विद्यासमिती सचिव भानुदास रिठे यांनी प्रशिक्षण परिषदेला याबाबत पत्र दिले आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांना 'या' विषयाचे अतिरिक्त गुण मिळणार का ? बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले ..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले जातात.एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर ग्रेस गुणांच्या आधारे विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तसेच इयत्ता नववीसाठी 20 ग्रेस गुण देण्याची तरतूद आहे. परंतु, इयत्ता पाचवी,  आठवीसाठी केवळ 10 ग्रेस गुण देण्याचे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना सुध्दा 20 ग्रेस गुण द्यावेत. कारण अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही,असे मुख्याध्यापक संघाच्या पत्रात नमूद केले आहे. 

इयत्ता पाचवी व आठवी या दोनच इयत्ताच्या वार्षिक परीक्षा घ्यायच्या का ? सर्व इयत्ताच्या परीक्षा घ्यायच्या याबाबत खुलासा करावा. इयत्ता तिसरी ते आठवी PAT परीक्षा तीन विषयांचे प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा हे तीन विषयांचे पेपर आपण सर्व विद्यार्थी शाळांना वितरित करणार आहात का? , PAT  परीक्षा नियोजन सत्र परीक्षेच्या आगोदार किमान 20 दिवस आंगोदार घेणे बाबत विचार व्हावा. पायाभूत चाचणी नियोजन जून महिन्यातच होणे आवश्यक आहे. संकलित मूल्यमापन  चाचणी व दोन या प्रथम सत्र व द्वितीय सत्राच्या किमान तीन आठवडे घेण्याची व्यवस्था करावी,हा बदल होणे आवश्यक आहे असे वाटते. गैरहजर विद्यार्थ्यांबाबत निर्णय होणे आवश्यक आहे. पाचवीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी आरटीई नियमाप्रमाणे पुढे जात आहे, याबाबत आपण मार्गदर्शन करावे. केंद्रस्तरावर शाळांना प्रश्नपत्रिका गठ्ठे विद्यार्थी संख्येनुसार मिळावेत, या सर्व मुद्यांवर विचार करून योग्य मार्गदर्शन करावे,अशी विनंती मुख्याध्यापक संघाने केली आहे.