डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांची विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर निवड

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार अधिसभेतून विद्या परिषदेवर एक सदस्य निवडून दिला जातो.त्यानुसार डॉ.एकबोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांची विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सह सचिव डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांची विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर एकमताने निवड करण्यात आली.या निवडीबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिसभेच्या सदस्यांमधून एका सदस्याची निवड विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर (अकॅडमी कौन्सिल) केली जाते.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत डॉ. एकबोटे यांची निवड करण्याचा प्रस्ताव आधिसभेत मांडण्यात आला.त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली.

डॉ. एकबोटे यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याचा प्रदिर्घ अनुभव असून संस्थाचालक संवर्गातून त्या अधिसभेवर निवडून गेल्या आहेत.विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार अधिसभेतून विद्या परिषदेवर एक सदस्य विद्या परिषदेवर नियुक्त केला जातो.त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली.

 डॉ.जोत्स्ना एकबोटे या शिक्षिका होत्या.त्यामुळे विद्या परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक निर्णयांमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.या निवडीबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी त्यांचा सत्कार केला.