NEET UG 2024 : NTA कडून लवकरच प्रवेशपत्र प्रसिद्ध होणार

प्रवेशपत्र एकदा रिलीज झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in आणि neet.ntaonline.in वरून डाउनलोड करू शकतील.

NEET UG 2024 : NTA कडून लवकरच प्रवेशपत्र प्रसिद्ध होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी  (NTA) कडून लवकरच NEET UG 2024 या परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध (Admit card released) करणे अपेक्षित आहे. प्रवेशपत्र एकदा रिलीज झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in आणि neet.ntaonline.in वरून डाउनलोड करू शकतील. NTA ने आधीच NEET UG 2024 परीक्षा सिटी स्लिप प्रसिद्ध केली आहे जी अधिकृत वेबसाइटवर नोंदणीकृत उमेदवार डाउनलोड करू शकतात.

NEET UG 2024 प्रवेश परीक्षा 5 मे 2024 रोजी दुपारी 2 पासून संध्याकाळी 5:20 पर्यंत एकाच शिफ्टमध्ये होणार आहे. ही परीक्षा भारतातील 571 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 14 शहरांमध्ये पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाईल. इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, ओडिया, कन्नड, पंजाबी, उर्दू, मल्याळम, मराठी, तेलगू आणि तामिळ या भाषांमध्ये आयोजित केले जाईल. NEET UG 2024 परीक्षेसाठी तब्बल 23 लाख 81 हजार 833 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड 

प्रथम अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, NEET UG प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा. लॉग इन पृष्ठावर आपली क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा. NEET UG प्रवेशपत्र 2024 प्रदर्शित केले जाईल. पुढील गरजांसाठी NEET UG ॲडमिट कार्ड 2024 डाउनलोड करा आणि मुद्रित करा.