शेतकरी आंदोलनामुळे बारावीचे पेपर पुढे ढकलणार ? CBSE ने स्पष्टच सांगितलं..

सीबीएसईने कोणतीही परीक्षा पुढे ढकलली नाही. शिवाय सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या माहितीकडे लक्ष देऊ नका, असे बोर्डाने सांगितले आहे.

शेतकरी आंदोलनामुळे बारावीचे पेपर पुढे ढकलणार ? CBSE ने स्पष्टच सांगितलं..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

सध्या दिल्लीच्या सीमेवर उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर  CBSE बोर्डाच्या परीक्षेबाबत सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. बारावीचे (12th Exam) पेपर पुढे ढकलले जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या (Fake News) जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढत आहे. त्यावर आता बोर्डाने स्पष्टीकरण (Explanation of the Board) दिले आहे. सीबीएसईचे कोणतेही पेपर पुढे ढकलले नाहीत. शिवाय सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या माहितीकडे लक्ष देऊ नका, असे CBSE कडून सांगण्यात आले आहे.    

अनैतिक घटकांकडून प्रश्नपत्रिका हाती लागल्याचे सांगण्यासाठी यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवा पसरवल्या जात आहेत. बनावट प्रश्नपत्रिकांचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करत पैशाची मागणी केली जाते. परंतु काही या व्यक्ती, गट आणि एजन्सी निष्पाप विद्यार्थी आणि पालकांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बेजबाबदार कृत्यांमुळे विद्यार्थी आणि जनतेमध्ये संभ्रम आणि दहशत निर्माण होते. त्यामुळे पालकांना व मुलांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा कोणत्याही कृतीत सहभागी होऊ नये, असेही बोर्डाने म्हटले आहे. 

परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी बोर्डाने चोख व्यवस्था केली आहे. खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध तरतुदींनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या पसरवण्यात गुंतलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी सीबीएसई कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई केली जाईल, असाही इशारा बोर्डाने दिला आहे.