UPSC प्रिलिम्स परीक्षेचे पॅटर्न बदलणार का? 

2023 च्या प्राथमिक परीक्षेवर नजर टाकली तर त्यात अनेक नवीन प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते.

UPSC प्रिलिम्स परीक्षेचे पॅटर्न बदलणार का? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने  (UPSC) यावर्षी 16 जून रोजी नागरी सेवा परीक्षेची पूर्वपरीक्षा घेतली. मीडिया रिपोर्ट नुसार UPSC  ने Prelims Exam 2024 च्या पेपरमध्ये काही नवीन प्रश्न विचारले आहेत. हे पाहता येत्या काही वर्षांत यूपीएससी सीएसई परीक्षेचा पॅटर्न (UPSC CSE Exam Pattern)बदलू शकते,  अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.  

या वर्षी UPSC प्रिलिम्स परीक्षेने आगामी वर्षांच्या परीक्षेच्या पद्धतीतील बदलांबद्दल मोठे संकेत दिले आहेत. 2023 च्या प्राथमिक परीक्षेवर नजर टाकली तर त्यात अनेक नवीन प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यामध्ये स्टेटमेंट रिलेशन आणि  करेक्ट इन करेक्ट असे अनेक प्रश्न होते.  याशिवाय 2021 मध्ये दोन विधानांमधील संबंधाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर 2022 मध्ये हा प्रश्न विचारला गेला नाही.

यावर्षी UPSC ने प्रिलिम्स 2024 प्रश्नपत्रिकेत दोन नवीन प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. यापैकी एक तीन विधानांमधील संबंध आणि दुसरे  ज्यामध्ये तीन कॉलममध्ये मॅचिंग करावे लागेल होते. येत्या काही वर्षांत UPSC असेच अनेक प्रश्न विचारू शकेल असे मानले जात आहे.

UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागते. प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. मेन्सनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. या तीन टप्प्यांनंतर, UPSC निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करते. यावर्षी प्रिलिम्स परीक्षा घेण्यात आली असून, त्यानंतर उमेदवारांनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली आहे