पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना प्लॅगारिझम सॉफ्टवेअरचा रिपोर्ट बंधनकारक ; काय आहे नवीन नियम 

शोधप्रबंध जमा करण्यापूर्वी प्लॅगारिझम सॉफ्टवेअर रिपोर्ट तयार करावा लागणार

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना प्लॅगारिझम सॉफ्टवेअरचा रिपोर्ट बंधनकारक ; काय आहे नवीन नियम 
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :

पीएच.डी.(phd)साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या (student) संशोधनात अचूकता यावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना अधिक खबरदारी बाळगावी लागणार आहे. कारण शोधप्रबंध जमा करण्यापूर्वी प्लॅगारिझम सॉफ्टवेअर रिपोर्ट (Plagarism Software Report) तयार करावा लागणार आहे. संशोधनात होणाऱ्या वाड्.मय चौर्य ला चाप बसवण्यासाठी केंद्र शासनाच्या शोध शुद्धी या उपक्रमांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना आता 'ड्रीलबीट एक्सट्रेम प्लॅगारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर'  (DrillBit plagiarism detector Software)  मध्ये आपला पीएच. डी. शोधप्रबंध तपासून घ्यावा लागणार आहे. याबबात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक प्रवेश विभागाने परिपत्रक प्रसिध्द केले आहे. 

संशोधनात होणाऱ्या वाड्.मय चौर्याला आळा घालण्यासाठी पीएच.डी. शोधप्रबंध  प्लॅगारिझम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासले जात आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे Trunitin आणि Urkund या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासणी करून शोधप्रबंध जमा करून घेतला जात होता. तयासाठी संशोधक मार्गदर्शकांना लॉगीन उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, केंद्र शासनाच्या शोध शुद्धी उपक्रमाचा भाग म्हणून INFLIBNET या प्रकल्पांतर्गत १ नोव्हेंबर २०२३ पासून 'ड्रीलबीट एक्सट्रेम प्लॅगारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर लागू करण्यात आले आहे.

हेही वाचा : टीईटी घोटाळ्यात तुकाराम सुपेसह आणखी दोघांवर गुन्हे दाखल

विद्यापीठाच्या आदेशानुसार विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभागातील संशोधक मार्गदर्शकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पीएचडी. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन प्रबंध सादर करताना Trunitin या सॉफ्टवेअरमध्ये तपासणी करून त्याचा वाड्.मय चौर्य अहवाल जमा करावा.तर विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रातील संशोधक मार्गदर्शकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शोध प्रबंध 'ड्रीलबीट एक्सट्रेम प्लॅगारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर'मधून तपासून त्याचा अहवाल जमा करावा.

वाड्.मय चौर्य अहवाल तपासणी करताना संशोधक मार्गदर्शकांनी त्यांच्या लॉगीनद्वारे तपासावा व तो अहवाल संशोधन केंद्राच्या डिपार्टमेंटल अॅकॅडमीक इनटीग्रीटी पॅनल (DAIP) समितीच्या समोर ठेवून त्यावर सदस्यांच्या स्वाक्षरीसह विद्यापीठाकडे पाठवावा.