5th and 8th Scholarship Result 2023 : पाचवी,आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

शिष्यवृत्ती निकालात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून गडचिरोली जिल्हा सर्वात शेवटी आहे.

5th and 8th Scholarship Result 2023 : पाचवी,आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
5th and 8th Scholarship Result 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Council of Examination) घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल (5th and 8th scholarship result 2023 ) जाहीर झाला असून राज्याचा इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के तर आठवीचा निकाल १५.६० टक्के एवढा लागला आहे. शिष्यवृत्ती निकालात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून गडचिरोली जिल्हा सर्वात शेवटी आहे. परिषदेच्या www.mscepune.in व www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ९ लाख ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ लाख ७० हजार १६२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते.परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७० हजार २६८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले त्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार २५१ एवढी आहे.

हेही वाचा : शिक्षण विद्यार्थ्यांनो, लवकरच उघडणार ‘जादुई पिटारा’; खेळांच्या माध्यमातून घ्या शिकण्याचा आनंद

राज्यातील इयत्ता पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील पाच लाख १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक लाख १४ हजार ७१० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर इयत्ता आठवीसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ६७ हजार ८०२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५६ हजार ०३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील पाच ५५ हजार ५५८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. इयत्ता आठवीच्या १६ हजार ५३७ विद्यार्थ्यांना तर इयत्ता आठवीच्या १४ हजार ७१४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा इयत्ता पाचवीचा निकाल ४० टक्के लागला असून आठवीचा निकाल २९ टक्के लागला आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पाचवीचा निकाल ७ टक्के तर आठवीचा निकाल ५.१० टक्के लागला आहे.

"इयत्ता पाचवी ,आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.  कोल्हापूर जिल्हा निकालात प्रथम क्रमांकावर असून गडचिरोली जिल्हा सर्वात शेवटी आहे.तर वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी मंजूर असलेल्या संचाएवढे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्तीस पात्र झाले नाहीत. इतर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत."

- शैलजा दराडे ,आयुक्त ,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD