रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी विशाल कठारे याचा उत्कृष्ट NSS सेवेसाठी गौरव

जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विशाल कठारे याचे अभिनंदन केले.

रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी विशाल कठारे याचा उत्कृष्ट NSS सेवेसाठी गौरव

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (Raisoni College) येथील विद्यार्थी विशाल कठारे (Vishal Kathare) याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) राष्ट्रीय सेवा योजना (NSS) उपक्रमांमध्ये असाधारण उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफ्फुल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, वित्त व लेख अधिकारी चारुशीला गायके, प्राचार्य नितीन घोरपडे, प्राचार्य देविदास वायदंडे, डॉ. संदीप पालवे, विद्याथी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी यांच्या उपस्थित विशाल कठारे याचा गौरव झाला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रभारी संचालक डॉ. सदानंद भोसले, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. प्रशांत धुतेकर, कमल उके यांच्यासह पुणे विद्यापीठातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वाडिया महाविद्यालयात मिळणार मोफत प्रशिक्षण

जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विशाल कठारे याचे अभिनंदन केले. केवळ शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे तर समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे असे अपवादात्मक विद्यार्थी असल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. डॉ. खराडकर यांनी विशालला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तो यापुढेही समाजासाठी एक संपत्ती बनून राहील आणि तो कुठेही जाईल असा विश्वास व्यक्त केला.

रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन डॉ. सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी आणि जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सर्व कर्मचारी यांनी विशाल कठारेच्या यशासाठी अभिनंदन केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD