लेफ्टनंट जनरल डॉ. शेकटकर यांना तिसऱ्यांदा पीएच.डी

जनरल शेकटकर यांनी यापूर्वी संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयात 'लेफ्ट विंग एक्सट्रीमिजम अँड इट्स इम्पॅक्ट ऑन नॅशनल सिक्युरिटी ऑफ इंडिया' या विषयावर संशोधन करत पीएच.डी प्राप्त केली आहे.

लेफ्टनंट जनरल डॉ. शेकटकर यांना तिसऱ्यांदा पीएच.डी
Dr. D. B. Shekatkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सिक्कीम सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी.बी. शेकटकर (Dr. D. B. Shekatkar) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) पीएच.डी प्रदान केली आहे. त्यांना मिळालेली ही तिसरी पी.एचडी असून वयाच्या ७५ व्या वर्षीही त्यांचा शिक्षणातील रस पाहून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. (Savitribai Phule Pune University)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात त्यांनी 'सायकॉलॉजीकल वॉरफेअर इन 21 सेंच्युरी इन द काँटेक्स ऑफ सोशल मीडिया' या विषयात विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.विजय खरे यांच्या मार्गर्शनाखाली त्यांनी ही पीएच.डी प्राप्त केली आहे. 

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा http://eduvarta.com/

जनरल शेकटकर यांनी यापूर्वी संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयात 'लेफ्ट विंग एक्सट्रीमिजम अँड इट्स इम्पॅक्ट ऑन नॅशनल सिक्युरिटी ऑफ इंडिया' या विषयावर संशोधन करत पीएच.डी प्राप्त केली आहे. तसेच मॅनेजमेंट सायन्स या विषयात सिंबायोसिस विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केली आहे. अशा एकूण तीन डॉक्टरेट त्यांना प्राप्त झाल्या आहेत. 

हेही वाचा : बलशाली भारतासाठी एकात्म मानवतावादाचा जागर व्हावा : डॉ. कारभारी काळे

जनरल शेकटकर हे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र या विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज अध्यासानाचे प्रमुख होते. सध्या ते 'फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी ऑफ इंडिया'चे अध्यक्ष आहेत. त्यांनी १७ पुस्तकांसाठी सहलेखन केले असून त्यातील एक हे अमेरिकेत प्रसिद्ध झाले