‘सारथी’कडून सुवर्णसंधी : एम.फील., पीएच.डी. साठी मिळवा आर्थिक सहाय्य

सारथीकडून अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज (Online Application) करण्याची मुदत १५ मेपर्यंत देण्यात आली होती. तर साक्षांकित प्रत पाठविण्याची मुदत २५ मे ठेवण्यात आली होती.

‘सारथी’कडून सुवर्णसंधी : एम.फील., पीएच.डी. साठी मिळवा आर्थिक सहाय्य
SARATHI Fellowship

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथीकडून (SARATHI) विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. मराठा (Maratha), कुणबी, कुणबी-मराठा समाजाच्या नॉन-क्रिमीलेयर विद्यार्थ्यांसाठी सारथीकडून एम.फील. (M.Phil.) व पी.एचडी. (Ph.D.) साठी अधिछात्रवृत्ती (Fellowship) दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १० जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सारथीकडून अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज (Online Application) करण्याची मुदत १५ मेपर्यंत देण्यात आली होती. तर साक्षांकित प्रत पाठविण्याची मुदत २५ मे ठेवण्यात आली होती. परंतू अनेक पात्रताधरकांना सेतूमधून कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. सेतूमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे नॉन क्रिमीलेयर दाखला, उत्पन्न दाखला मिळण्यास विलंब लागत आहे. तसेच अनेकांना विद्यापीठांकडून पीएचडी विषयाचे कन्फर्मेशन लेटर मिळालेले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी अधिछात्रवृत्तीपासून वंचित राहतील. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्याची मागणी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी केली होती.

हेही वाचा : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! UPSC कडून २४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

त्यानुसार सारथीकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी २५ मार्च २०२२ या तारखेला किंवा या तारखेनंतरच पीएच.डी. कायम नोंदणी असलेले उमेदवार पात्र आहेत. शिष्यवृत्तीअंतर्गत पीएचडीसाठी पहिले दोन वर्षे ३१ हजार तर नंतरची तीन वर्षांसाठी ३५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

अधिछात्रवृत्ती अंतर्गत अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य हे सारथी कडून ज्या दिवशी अवॉर्ड लेटर (Award Letter) दिले जाईल, त्या तारखेपासून उमेदवाराच्या M.Phil च्या उर्वरित कालावधी करिता किंवा दोन वर्ष यापैकी जी अगोदरची तारीख असेल त्या तारखेपर्यंत अनुज्ञेय राहील. Ph.D करिता उर्वरित कालावधी किंवा पाच वर्ष यापैकी जी अगोदरची तारीख असेल त्या तारखेपर्यंत अनुज्ञेय राहील. कोणत्याही उमेदवारास पूर्वलक्षी प्रभावाने (Retrospectively) आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही. उमेदवाराची निवड ही तज्ञ समिती कडून मूल्यमापन गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

अधिछात्रवृत्तीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा : https://sarthi-maharashtragov.in

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2