UPSC चे विविध पदांच्या भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)  2025  साठी विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

UPSC चे विविध पदांच्या भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

UPSC च्या विविध भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)  2025  साठी विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध (Exam schedule published)केले आहे. या परीक्षा दिनदर्शिकेद्वारे, UPSC ने CSE, NDA, CDS, IFS, IES ISS, जिओ-सायंटिस्ट आणि इतर परीक्षांच्या तारखा तसेच परीक्षा देण्यासाठी नोंदणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार उमेदवार 22 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नागरी सेवा परीक्षा 2025 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 म्हणजेच UPSC पूर्व परीक्षा 2025 च्या एकत्रित प्राथमिक परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी करू शकतील. ही परीक्षा 25 मे रोजी होणार आहे. CSE प्रिलिम्समध्ये यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांसाठी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025 येत्या  22 ऑगस्टपासून आयोजित केली जाईल, ही परीक्षा 5 दिवस चालणार आहे.

UPSC द्वारे प्रसिद्ध केलेल्या 2025 परीक्षेच्या वेळापत्रकानुसार राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (NDA/NA) परीक्षा 2025 आणि कम्बईड डिफेन्स सर्वीस  (CDS) परीक्षा 2025 साठी नोंदणी 11 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान होईल.  यानंतर, नोंदणीकृत उमेदवारांची परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी घेतली जाईल.
UPSC ने आपल्या परीक्षा वेळापत्रकात  घोषित केले आहे, की अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा (ESE प्रिलिम्स) 2025 साठी नोंदणी 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वीकारली जाईल. यानंतर 9 फेब्रुवारी 2025 रोजी परीक्षा होणार आहे.

 UPSC द्वारे घेण्यात येणारी संयुक्त भू-वैज्ञानिक प्राथमिक 2025 ची परीक्षा  9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. उमेदवार या परीक्षेला बसण्यासाठी 4 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करू शकतील.