CBSE च्या अकरावी ,बारावीच्या  विद्यार्थ्यांसाठी NCERT कडून ऑनलाइन कोर्स 

अकाऊंटन्सी, बिझनेस स्टडीज, बायोलॉजी, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, भूगोल, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, सायकोलॉजी, इंग्लिश आणि सोशियोलॉजी यासह 11 विषयांचा समावेश आहे.

CBSE च्या अकरावी ,बारावीच्या  विद्यार्थ्यांसाठी NCERT कडून ऑनलाइन कोर्स 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने CBSE च्या इयत्ता 11वी आणि 12वी च्या (CBSE Class 10 th  12 th students) विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोर्स (Online courses for students)तयार केले आहेत. हे कोर्सेस 'तरुण महत्वाकांक्षी मनांसाठी सक्रिय शिक्षणाचा अभ्यास' (स्वयंम)  प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सर्व संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना या संदर्भातील पत्र पाठवले आहे. NCERT इयत्ता 11 आणि 12 साठी 28 ऑनलाइन कोर्सेस ऑफर करत आहे. या अभ्यासक्रमांमध्ये अकाऊंटन्सी, बिझनेस स्टडीज, बायोलॉजी, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, भूगोल, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, सायकोलॉजी, इंग्लिश आणि सोशियोलॉजी यासह 11 विषयांचा समावेश आहे.हे अभ्यासक्रम 22 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू असून येत्या 1 सप्टेंबर 2024 रोजी बंद होईल.नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना https://swayam.gov.in/ वर जावे लागेल.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने (MOE) सुरू केलेले स्वयंम प्लॅटफॉर्म, विद्यार्थ्यांसाठी शिकण्याच्या संधी वाढविण्यासाठी डिझाइन केलेले ऑनलाइन अभ्यासक्रम (MOOCs) ऑफर करते. SWAYAM MOOCs वर ऑफर केलेले अभ्यासक्रम हे परस्परसंवादी आहेत आणि देशातील सर्वात नामांकित शिक्षकांनी तयार केले आहेत. तसेच हे कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत.