ITI : आयटीआयच्या अभ्यासक्रमात ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’

महापुरुषांच्या कर्तृत्वाने प्रेरणेने आणि विचाराने महाराष्ट्र समृदध, समर्थ आणि स्वयंपूर्ण झाला आहे. महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे तत्व यशस्वीपणे अंगिकारले होते.

ITI : आयटीआयच्या अभ्यासक्रमात ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) अभ्यासक्रमात ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ या पुस्तकाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. या पुस्तकासाठी सुमारे वीस तास दिले जाणार असून शिल्पनिदेशक किंवा तासिका तत्वावरील शिक्षकांकडून हे पुस्तक शिकविले जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 

महापुरुषांच्या कर्तृत्वाने प्रेरणेने आणि विचाराने महाराष्ट्र समृदध, समर्थ आणि स्वयंपूर्ण झाला आहे. महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे तत्व यशस्वीपणे अंगिकारले होते, अशा महापुरुषांच्या कौशल्य विषयक अप्रतिम ध्येय धोरणाची ओळख व महात्म्य आजच्या तरुण पिढीला विशेषत: कौशल्य शिक्षण घेणाऱ्या तरुणांना होणे गरजेचे आहे. यासाठी महापुरुषांच्या कौशल्य विषयक कार्याचा, धोरणाचा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये समावेश  केल्यास निश्चितच व्यवसाय शिक्षण अधिक समृद्ध होऊन विद्यार्थ्याचे कौशल्य निपुण होण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

AISSEE 2024 : सैनिक शाळा प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

 

महापुरुषांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी संचालनालय स्तरावरुन समिती गठीत करण्यात आली होती. समितीमार्फत पाच महापुरुषांच्या विचारांवर आधारीत "महापुरुषांचे कौशल्य विचार" निदेशक हस्तपुस्तिका  तयार करण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमामध्ये "महापुरुषांचे कौशल्य विचार या पुस्तकातील अभ्यासक्रमाचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सद्यस्थितीतील अभ्यासक्रमाव्यतिरिक्त “महापुरुषांचे कौशल्य विचार" या निदेशक हस्तपुस्तिकेचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना शिकविला जाणार आहे. शिल्पनिदेशक पदावर नियमित असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथमतः सदर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यावे. आवश्यकता असल्यास, सद्यस्थितीत Employability Skill हा विषय हाताळणाऱ्या तासिका  तत्वावरील शिक्षकांकाडून अभ्यासक्रम शिकविण्यात यावा, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO