AISSEE 2024 : सैनिक शाळा प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

AISSEE 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत  आहे. देशभरातील ३३ सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी AISSEE आयोजित केली जाते.

AISSEE 2024 : सैनिक शाळा प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू
AISSEE 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE 2024) साठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना Exams.nta.ac.in/AISSEE/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचे फॉर्म सबमिट करू शकतात. (ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAM)

 

AISSEE 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत  आहे. देशभरातील ३३ सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी AISSEE आयोजित केली जाते. सैनिक शाळा या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा आहेत.

दिवाळी सणाला भडक स्वरुप, खरी दिवाळी हरवत चाललोय! शिक्षण आयुक्तांची विद्यार्थ्यांना साद

 

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, भारतीय नौदल अकादमी आणि इतर प्रशिक्षण अकादमींसाठी येथे कॅडेट तयार केले जातात.  संरक्षण मंत्रालयाने (MoD) नुकतेच  १९ नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत १९ नवीन सैनिक शाळांमध्येही प्रवेश दिले  जाणार आहेत. 

 

सैनिक शाळा प्रवेश परीक्षा दि. २१ जानेवारी २०२४ रोजी OMR/पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेत MCQ प्रकारचे प्रश्न असतील. ही परीक्षा देशभरातील १८६ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. खुला गट, माजी सैनिक, ओबीसी  (एनसीएल) साठी अर्ज शुल्क ६५० रुपये आहे. तर अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांसाठी हे शुल्क ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

 

इयत्ता ६ वी मध्ये प्रवेशासाठी पात्रता

दि. ३१ मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय १०-१२ वर्षांच्या दरम्यान असावे. मुलींसाठी इयत्ता ६ वी  साठी प्रवेश खुला आहे, जागांच्या उपलब्धतेच्या अधीन आहे आणि वयाचा निकष मुलांसाठी समान आहे.  

 

इयत्ता ९ वी प्रवेशासाठी पात्रता

दि. ३१ मार्च २०२४ रोजी वय १३-१५ वर्षांच्या दरम्यान असावे, प्रवेशाच्या वेळी मान्यताप्राप्त शाळेतून ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मुलींचे प्रवेश खुले आहेत आणि जागा उपलब्धतेच्या अधीन आहेत. वयोमर्यादा मुलांसाठी समान आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO