स्वाधारचा चमत्कार : 24 तासात पाच कोटी मंजूर; प्रकाश आंबेडकरांचा पाठपुरावा                    

गेल्या 24 दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. परंतु,विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.   

स्वाधारचा चमत्कार : 24 तासात पाच कोटी मंजूर; प्रकाश आंबेडकरांचा पाठपुरावा                    

एजयवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

 समाज कल्याण विभागातर्फे samaj kalyan राबविल्या जात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या Dr.Babasaheb Ambedkar swadhar Yojana लाभाची रक्कम विद्यार्थ्यांना मिळावी, या मागणीसाठी 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता यश मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच  वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर Prakash  Ambedkar यांनी आंदोलक  विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर समाज कल्याण विभागाला खडबडून जाग आली. पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात  लाभाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया समाज कल्याण विभागाने पूर्ण केली असून २४ तासात तब्बल १ हजार २३२ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याचा आणि एकूण ५ कोटी रुपयांपर्यंतचा निधी वितरित करण्याचा चमत्कार केला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात असून गेल्या 24 दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती समाज कल्याण विभागाकडून केली जाता आहे. परंतु,विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला असल्याचे अनिकेत बनसोड, महेश बळवंत , सचिन साबणे यांनी सांगितले.    

     दरम्यान,  विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने समाज कल्याण विभागाने २४ तास काम करून १२३२ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या ५ कोटी रुपयांचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत.रात्रीतूनच अर्ज मंजूर करून देयके कोषागार कार्यालयात सादर केले आहेत.गेल्या २४ तासांमध्ये १२३२ व त्याआधी १३६ असे १३६८ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे स्वतः रात्री उशिरापर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे येथे तळ ठोकून होते. पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या नियंत्रणाखाली पुणे विभागातील सहाय्यक आयुक्त पुणे, सातारा ,सोलापूर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुणे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची तपासणी कामे टीम तयार करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या २४ तासांमध्ये सुमारे 3 हजार अर्जांची तपासणी करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने ही तत्परता यापूर्वीच दाखवली असती तर विद्यार्थ्यांना 24 दिवस आंदोलन करण्याची वेळ आली नसती, असे आंदोलन विद्यार्थ्यांनी सांगितले.

"विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणतेही अडचण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे.राज्यासाठी नुकताच रुपये १५ कोटीचा निधी प्राप्त झाला *होता,त्यापैकी पुणे जिल्ह्यासाठी रुपये ५ कोटी देण्यात आला असून त्यातून १३६८ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. उर्वरित निधीची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे,निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल "

 -डॉ प्रशांत नारनवरे आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे.