‘चक्री'ने पटकावला सरपोतदार करंडक; मयूर जेऊरकर, पूर्वा हारूगडेची अभिनयात कमाल

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘चक्री'ने पटकावला सरपोतदार करंडक; मयूर जेऊरकर, पूर्वा हारूगडेची अभिनयात कमाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

बृह्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (BMCC) वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब तथा विश्वासराव सरपोतदार प्रसंग नाट्य स्पर्धेत 'चक्री' संस्थेने सादर केलेल्या ‘न्यूनगंड’ या प्रसंग नाट्याला प्रथम क्रमांक मिळाला. यंदा या स्पर्धेत एकूण ३४ संघांनी सहभाग घेतला. त्यात २६ महाविद्यालये आणि ८ संस्थांचा समावेश होता.

 

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री पौर्णिमा मनोहर आणि मंजुश्री कुलकर्णी यांनी परीक्षण केले. आंतरमहाविद्यालयीन स्वरूपाची ही स्पर्धा असून यंदा पहिल्यांदाच खुल्या गटात घेण्यात आली. स्पर्धेचे हे एकविसावे वर्ष होते.

Promise to Protect : तंबाखूमुक्त भारतासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मोहीम

 

 स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -

 

सांघिक

1. न्यूनगंड (चक्री)

2. सापळा (ही स्टोरी)

3. लाज (फर्ग्युसन)

उत्तेजनार्थ - पत्र (सिंबायोसिस)

 

दिग्दर्शन

1. शौनक जोशी (चक्री) - न्यूनगंड

2. साईश ध्वुरी (पीव्हीजी सीओईटी) - खिडकी

3. निधी कुलकर्णी (एमकेएसएसएस कमिन्स)  - आभास

उत्तेजनार्थ - ओम बुरबुरे (इन्सर्च) चिखल

 

पुरूष अभिनय

1. मयूर जेऊरकर  (ही स्टोरी)- सापळा

2. हेमंत संचेती (चक्री) - न्यूनगंड

3. वेदांग सौंदलगेकर (अहन थिएटर)-पात्र

उत्तेजनार्थ - ओजस अत्नरदे (सिंबायोसिस) - पात्र

 

स्त्री अभिनय

1. पूर्वा हारूगडे (आयएलएस) - उंबरठा

2. केतकी डिके  (कावेरी) - धु्रवतारा

3. आर्या पिसे (व्हीएलटी) - मृत्यूपत्र

4. उत्तेजनार्थ - ईश्वरी जोशी (फर्ग्युसन) - लाज

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k