जेईई मेन सेशन 2 च्या परीक्षेच्या नोंदणीसाठी उद्या पर्यंत मुदतवाढ 

जेईई मेन सेशन 2 च्या परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी 2 मार्चच्या नियोजित शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्म भरला नाही, त्यांना आता उद्या 4 मार्च 2024 पर्यंत मुदतवढ देण्यात आली आहे. 

जेईई मेन सेशन 2 च्या परीक्षेच्या नोंदणीसाठी उद्या पर्यंत मुदतवाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जेईई मेन सेशन 2 च्या (JEE Main Session 2) परीक्षेत सहभागी होण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Participating students) मोठी बातमी आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Last date for submission of application) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वाढवली आहे. ज्या उमेदवारांनी 2 मार्चच्या नियोजित शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्म भरला नाही, त्यांना आता उद्या 4 मार्च 2024 पर्यंत मुदतवढ देण्यात आली आहे. 

इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत पोर्टल jeemain.nta.ac.in वर भेट देऊन अर्ज प्रक्रिया त्वरित पूर्ण करू शकतात. अर्जाच्या तारखा वाढवण्यासोबतच दुरुस्तीच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. अर्ज भरताना कोणत्याही उमेदवाराने काही चूक केली असेल, तर ते 6 आणि 7 मार्च 2024 रोजी दुरुस्त करू शकतील. 
कसा कराल अर्ज 

JEE मुख्य सत्र 2 अर्ज भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील  जा आणि JEE(मुख्य) 2024 वर क्लिक करा. सत्र-2 साठी नोंदणी आणि लॉगिन करण्यासाठी  क्लिक करा. पुढील पृष्ठावर, उमेदवारांनी प्रथम नोंदणी करावी आणि नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. यानंतर उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क अपलोड करून फॉर्म पूर्ण करावा. पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी