येरवडा येथील शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू 

नुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत.

येरवडा येथील शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत (social welfare department )पुण्यातील येरवडा येथील (yerwada hostel )मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहात  2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु (hostel admission open ) झाली असून इच्छुकांना  प्रवेश घेण्याचे आवाहन वसतिगृहाच्या आधीक्षकांतर्फे करण्यात आले आहे. 

 शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी नंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. प्रवेश हा प्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार राहील. शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास, आंथरुण पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी या शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात,असे वसतिगृहाच्या आधीक्षकांतर्फे कळविण्यात आले आहे.