CA फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; ICAI  कडून सुधारित वेळापत्रक जाहीर

ICAI CA फाउंडेशन डिसेंबर परीक्षा आता ३१ डिसेंबर, २, ४ आणि ६ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. यापूर्वी या परीक्षा २४, २६, २८ आणि ३० डिसेंबर २०२३ रोजी होणार होत्या.

CA फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; ICAI  कडून सुधारित वेळापत्रक जाहीर
ICAI CA Foundation Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ICAI CA फाउंडेशन परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ने सीए फाउंडेशनच्या (CA Foundation) डिसेंबर २०२३ च्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत.  CA फाउंडेशन परीक्षा २०२३ डिसेंबर सत्रासाठी सुधारित परीक्षेच्या तारखा अधिकृत वेबसाइट icai.org वर पाहता येतील.

सुधारित वेळापत्रकानुसार, ICAI CA फाउंडेशन डिसेंबर परीक्षा आता ३१ डिसेंबर, २, ४ आणि ६ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. यापूर्वी या परीक्षा २४, २६, २८ आणि ३० डिसेंबर २०२३ रोजी होणार होत्या. मात्र १ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर  या कालावधीत होणार्‍या इंटरमिजिएट, फायनल आणि PQC परीक्षांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे ICAI कडून सूचित करण्यात आले आहे. 

आयुष NEET UG २०२३ समुपदेशन वेळापत्रक जाहीर; चार फेऱ्यांमधून होणार प्रवेश

सीए इंटरमिजिएटसाठी गट १ ची परीक्षा २,४,६ आणि ८ नोव्हेंबर  रोजी घेतली जाईल, तर गट दोनची  परीक्षा १०, १३, १५ आणि १७ नोव्हेंबर  रोजी होणार आहे. सीए फायनल २०२३ साठी, गट एकच्या  च्या परीक्षेच्या तारखा १,३,५ आणि ७ नोव्हेंबर रोजी निर्धारित केल्या आहेत, तर गट दोन  च्या परीक्षा ९, ११, १४ आणि १६ नोव्हेंबर  रोजी आयोजित केल्या जातील.

संस्थेने ५ जुलै रोजी आधीचे वेळापत्रक जाहीर केले होते.  पण काही अपिरिहार्य कारणांमुळे परीक्षेच्या तारखा बदलल्या जात असल्याचे संस्थेने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी पुढील अपडेटेड माहितीसाठी वेबसाईट वारंवार तपासत राहावे, असेही पत्रकात म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo