शिक्षक भरतीबाबत मोठी अपडेट : पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ, शिक्षण आयुक्तांची माहिती

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातून सुमारे एक लाख २६ हजार पात्र उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी केवळ ९५ हजार जणांनीच प्रमाणपत्र प्रमाणित केले आहे.

शिक्षक भरतीबाबत मोठी अपडेट : पवित्र पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ, शिक्षण आयुक्तांची माहिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) राज्यात शिक्षक भरतीची (Teachers' Recruitment) प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत सध्या पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) नोंदणी सुरू आहे. पात्र उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र भरण्यासाठी दि. १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण या मुदतीत पात्र उमेदवारांपैकी ५० टक्के उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र भरून प्रमाणित केलेले नाही. तसेच राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नसल्याने अडचणी येत आहेत. यापार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने त्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातून सुमारे एक लाख २६ हजार पात्र उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी केवळ ९५ हजार जणांनीच प्रमाणपत्र प्रमाणित केले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक /शिक्षक पदभरतीसाठी शासनाने “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या चाचणीस २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुण्यात उद्या ‘आक्रोश’

 

ही चाचणी दिलेल्या उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा दिलेली आहे. मात्र, राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नाही. तसेच दि.१४ सप्टेंबर रोजी पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता दिलेल्या मुदतीत पूर्ण होणार नाही. ही बाब विचारात घेता स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत अखेर मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मांढरे यांनी दिली.

 

तसेच हे प्रमाणीकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. त्यास उत्तर देण्यात येईल यासाठी कोणाही कर्मचारी अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आयटीआय’ विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; चाळीस वर्षांनंतर विद्यावेतनात भरघोस वाढ

 

जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत, ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक/ शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०२२" ही चाचणी दिलेल्या उमेदवारांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर भेट देऊन दि. २२ सप्टेंबरपर्यंत आपली कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

पवित्र पोर्टलवरील नोंदणी व प्रमाणीकरण

नोंदणी केलेले उमेदवार - १ लाख २६ हजार ४५३

अपूर्ण - १६ हजार २३५

पूर्ण पण प्रमाणित न केलेले - १५ हजार २७०

प्रमाणित केलेले - ९४ हजार ९४८

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j