तलाठी भरती 2023 : प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून होणार सुरुवात 

सोमवार दि. ६ मे रोजी सकाळी १०:०० वाजता या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.   

तलाठी भरती 2023 : प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेपासून होणार सुरुवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अमरावती विभागातील (Amravati Division) नवनियुक्त तलाठी (Newly appointed Talathi) यांचे १२० दिवसीय पायाभुत प्रशिक्षण नियोजित (Basic training planned) करण्यात आले आहे. त्याकरीता प्रशिक्षणार्थी उमेदवारांना येत्या ५ मे रोजी डाॅ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधनी, विद्यापीठ रोड, अमरावती येथे उपस्थित राहावे लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार येत्या ६ मे रोजी सकाळी १०:०० वाजता या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन (Inauguration of training programme) होणार आहे. 
 
प्रशिक्षण कालावधित प्रशिक्षणार्थींना अत्यावश्यक कारणाशिवाय सुटी दिली जाणार नाही. प्रशिक्षणार्थींना ५ मे रोजी प्रबोधिनी येथे पोहचण्याची काही अडचण असल्यास पर्यवेक्षक अधिकारी दिनेश बढीये यांना ९४२३८५४७९८ / ७२१९२२७४२५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर अधिकची माहिती द्यावी. प्रशिक्षण कालावधिमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रबोधिनिच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत व राजशिष्टाचारानुसार पुरुष कर्मचाऱ्यांना पांढरा शर्ट, काळा पँट (असल्यास ब्लेजर किंवा जॅकेट) तसेच महिला कर्मचाऱ्यांकरीता सोनेरी काठ असलेली ऑफव्हाइट रंगाचा साडी समारंभीय कार्यक्रमासाठी शासकीय पोषाख म्हणून ठरवून दिला आहे. 

प्रबोधिनी येथे प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रमासाठी वरील पोषाख ठरवून दिला असल्यामुळे येताना शासकीय पोषाख सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच आपणास क्षेत्रीय भेटीकरीता व मेळघाट भेटीच्या वेळी आवश्यक साहीत्य स्पोर्ट शुज, कॅप, टॉर्च, वॉटर बॉटल, लेदर शूज, चप्पल पाठीला लटकवता येइल अशी बॅग आवश्यक वाटल्यास शॉल स्वेटर तसेच योगा व खेळाकरीता आवश्यक असा पोशाख न चुकता सोबत आणावा. प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पेनड्राईव्ह, पासपोर्ट साईज २ फाटा, आधार कार्ड झेरॉक्स सोबत आणणे बंधनकारक आहे, असे सुचना पत्रात नमुद करण्यात आले आहे. 

उपरोक्त बाबीची नोंद घेऊन निश्चित करुन दिलेल्या तारखेला प्रशिक्षणास हजर राहता येईल या बेताने आपल्या अधिनस्त नवनियुक्त तलाठ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे, असे नमुद केले आहे.