CBSE बोर्डाचा महत्वपूर्ण निर्णय : सामान्य गणित घेणारे विद्यार्थी करू शकतील अकरावीत गणिताचा अभ्यास  

एखाद्या विद्यार्थ्याने 10 वी मध्ये सामान्य गणिताचा पर्याय निवडला असला तरी तो अकरावी मध्येही गणिताचा अभ्यास करू शकतो.

CBSE बोर्डाचा महत्वपूर्ण निर्णय : सामान्य गणित घेणारे विद्यार्थी करू शकतील अकरावीत गणिताचा अभ्यास  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये सुद्धा गणित विषयाचा अभ्यास (Study of mathematics)करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची माहिती समोर येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये सामान्य गणित (basic Mathematics in Class 10 th)हा विषय निवडला होता, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये सुद्धा इयत्ता अकरावीमध्ये गणित विषय घेता येईल. 

सीबीएसई बोर्डाने या संदर्भात  परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार  " एखाद्या विद्यार्थ्याने 10 वी मध्ये सामान्य गणिताचा पर्याय निवडला असला तरी तो अकरावी मध्येही गणिताचा अभ्यास करू शकतो." मंडळाने शाळा प्रमुखांना गणिताचा अभ्यास करण्यास परवानगी देण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि योग्यतेचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे.

नियमांनुसार  इयत्ता अकरावीमध्ये गणित विषय फक्त अशाच विद्यार्थ्यांना दिला जातो, ज्यांनी दहावीमध्ये स्पेशल गणित हा विषय निवडला होता. सीबीएसईने कोविड नंतर पहिल्यांदाच या नियमात शिथिलता आणली होती. गेल्या दोन शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना ही सुट देण्यात आली होती. 
"शैक्षणिक वर्ष  2024-25 साठी सुध्दा NEP मुळे अनेक बदल प्रस्तावित आहेत. म्हणून, तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर बोर्डाने केवळ शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी हा नियम पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे," असे  बोर्डाने परिपत्रकात नमूद केले आहे.