विद्यापीठातील राड्यावरुन, ललित कला केंद्राच्या प्रमुखांना निलंबित करा: अभाविप

दोशींवर कडक कारवाई करुन, ललित कला केंद्राचे प्रमुख डाॅ. भोळे यांच्या निलंबित करा

विद्यापीठातील राड्यावरुन, ललित कला केंद्राच्या प्रमुखांना निलंबित करा: अभाविप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ललित कला केंद्रातील (Lalit Arts Center) नाटकामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. यावर राजकिय, सामाजिक, कलाक्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) संघटनेने हा नाटकाचा कार्यक्रम उधळून लावला. त्यांच्याकडून ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रविण भोळे (Dr. Pravin Bhole) यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसे निवेदन देखील त्यांच्याकडून विद्यापीठाचे कुलगुरु (Vice-Chancellor) डॉ.सुरेश गोसावी यांना देण्यात आले आहे.

ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना नाटकाबाबत अटक (Savitribai Phule Pune University)  करण्यात आली आहे. 'जब वी मेट' (Jab vi Met) हे प्रायोगिक नाटक काल सादर करण्यात आलं. या नाटकात रामायणात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला.

आज अभाविपच्या कार्यक्रत्यांनी विद्यापीठाबाहेर घेराव घालत दोषीवर कडक कारवाई करुन, ललित कला केंद्राचे प्रमुख डाॅ. भोळे यांच्या निलंबनाची  करण्याची मागणी कुलगुरुंना केली.