Let’s change : प्रियदर्शनी स्कूल अँड जूनियर कॉलेजला (सीबीएसई ) राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान 

शाळेच्या प्राचार्या  डॉ . गायत्री जाधव, स्वच्छता मॉनिटर समन्वयक अश्विनी मेहेत्रे  आणि उपक्रमात सहभागी  झालेले  विद्यार्थी अरहा गायकवाड, पार्थ पवार, मेघना झोपे आणि देवेन जन्नावार यांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला.

Let’s change : प्रियदर्शनी स्कूल अँड जूनियर कॉलेजला (सीबीएसई ) राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्रॉजेक्ट लेट्स चेंज (Let’s change )अंतर्गत स्वच्छता मॉनिटर या उपक्रमांतर्गत भोसरी येथील इंद्रायणीनगर परिसरातील प्रियदर्शनी स्कूल अँड जूनियर कॉलेजला (सीबीईएसई) स्वच्छतेसाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार  प्रदान करण्यात आला.राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर पार पडलेल्या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या  डॉ. गायत्री जाधव, स्वच्छता मॉनिटर समन्वयक अश्विनी मेहेत्रे आणि उपक्रमात सहभागी  झालेले  विद्यार्थी अरहा गायकवाड, पार्थ पवार, मेघना झोपे आणि देवेन जन्नावार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी  let's Change movie मधील कलाकार, प्रेम चोपडा आणि आधुनिक गांधींजी आदी कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी अन् केळी

राज्यभरातील ६४ हजार १९८ शाळांममधून प्रियदर्शनी स्कूलची या पुरस्काराठी निवड झाली आहे. या उपक्रमात राज्यातील ६४ हजार १९८ शाळांनी सहभाग घेतला होता तर ५९ लाख ३१ हजार ४१० विद्यार्थ्यांनी उपक्रमांसाठी नोंदणी केली होती.'निष्काळजी मुक्त महाराष्ट्र' हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १०० शाळा स्वच्छतेसाठीच्या पुरस्करासाठी निवडण्यात आल्या आहेत.निष्काळजीपणे कचरा कोठेही टाकू नये आणि त्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून राज्याने मोहीम हाती घेतली.त्यात राज्यातील सहभागी घेऊन उल्लेखनीय काम करणाऱ्या शाळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Let’s change (लेट्स चेंज ) हा चित्रपट दाखवण्यात आला होता. त्यातून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी मॉनिटरगिरी करायला सुरुवात केली. या प्रकल्पात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाचे मजेशीर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.गायत्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी अस्वच्छता करणाऱ्या निष्काळजी लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले.

शाळा समन्वयक अश्विनी मेहेत्रे व सर्व वर्ग शिक्षकांनी नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्साही उत्स्फूर्त सहभागामुळे या शाळेची प्रोजेक्ट लेट्स चेंज या उपक्रमात राज्य पुरस्कारासाठी निवड झाली होती.