पीएच.डी.साठी रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स कोर्स बंधनकारक ; 2 क्रेडिटसाठी 4 हजार रुपये शुल्क

डिसेंबर 2019 नंतर पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी या कोर्सच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

पीएच.डी.साठी रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स  कोर्स  बंधनकारक ; 2 क्रेडिटसाठी 4 हजार रुपये शुल्क

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स  (Research and publication ethics) या विषयावर कोर्स सुरु करण्यात आला असून UGC ने दोन क्रेडिटचा हा कोर्स अनिवार्य केला आहे . या कोर्सला २१ मार्चपासून सुरुवात होणार असून हा कोर्स एक महिना कालावधीचा असणार आहे. डिसेंबर 2019 नंतर पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी या कोर्सच्या प्रवेशासाठी पात्र असतील.

शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून  सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स (CPE) ला  विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे. पीएच.डी. धारक उमेदवारांना यासाठी प्रवेश दिली जाणार असून कोर्ससाठी चार हजार रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाणार आहे. 

या कोर्समध्ये विज्ञान आणि नीतिशास्त्र, संशोधन या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारे एकूण सहा युनिट्स आहेत. या कोर्ससाठी १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. हा दोन क्रेडिटचा कोर्स असून हा संपुर्ण अभ्यास 30 तासांचा आहे. यामध्ये ट्यूटोरियल, असाइनमेंट, प्रश्नमंजुषा आणि गटचर्चा याद्वारे सतत मूल्यांकन केले जाईल. विद्यापीठाच्या नियमांनुसार अभ्यासक्रमाच्या शेवटी अंतिम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.