NBEMS फेलोशिप परीक्षेसाठी नोंदणी सुरु : ८ फेब्रुवारी अंतिम मुदत 

फेलोशिप प्रवेश परीक्षा ३ मार्च  रोजी घेतली जाईल. परीक्षेचा निकाल ३ एप्रिल  पर्यंत जाहीर केला जाईल.

NBEMS फेलोशिप परीक्षेसाठी नोंदणी सुरु : ८ फेब्रुवारी अंतिम मुदत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (National Board Of Examinations In Medical Sciences-NBEMS) कडून फेलोशिप प्रवेश परीक्षा (FET) २०२४ साठी नोंदणी सुरू झाली आहे. NBE FET  साठी नोंदणी करू इच्छिणारे उमेदवार natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२४ आहे.

फेलोशिप प्रवेश परीक्षा ३ मार्च  रोजी घेतली जाईल. परीक्षेचा निकाल ३ एप्रिल  पर्यंत जाहीर केला जाईल. परीक्षेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी किंवा प्रश्नांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट पोर्टल लिंक https://exam.natboard.edu.in/communication.php?page=main ला भेट देऊ शकतात, असे NBE कडून सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा : शिक्षण केंद्राच्या कोचिंग नियमावली विरोधात कोचिंग क्लासचालक आक्रमक; 28 जानेवारीला नाशिकमध्ये बैठक
परीक्षा शुल्कासह अर्ज सादर केलेल्या उमेदवारांसाठी ९  ते १२ फेब्रुवारी  दरम्यान दुरुस्ती विंडो उघडली जाईल. अर्जातील त्रुटी/ चुकीची छायाचित्रे दुरुस्त करण्यासाठी अंतिम विंडो १९ फेब्रुवारी रोजी उघडेल आणि २१ फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पदव्युत्तर वैद्यकीय पदवी पूर्ण केलेले आणि MD, MS, DM, MCh, DNB, DRNB किंवा समतुल्य मान्यताप्राप्त पात्रतेचे तात्पुरते उत्तीर्ण प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी पात्र मानले जातील. फेलोशिप कोर्समध्ये प्रशिक्षणासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही. NBEMS FET 2023 साठी अर्ज करणाऱ्या भारतीय उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३,५०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ४४,२५० रुपये जमा करावे लागतील.