CBSE : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण देताना शाळांकडून चूका; असे असतील गुण... 

सीबीएसईने यासंदर्भात सर्व संलग्न शाळांना सुचना केल्या आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या सर्व विषयांना एकूण १०० गुण असतील.

CBSE : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण देताना शाळांकडून चूका; असे असतील गुण... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता १०वी आणि १२वी परीक्षा २०२४ साठी लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प तसेच अंतर्गत मुल्यांकनासाठी गुण निश्चित केले आहेत. पण त्यानंतर गुण देताना शाळांकडून चुका होत असल्याचे निरीक्षण मंडळाने नोंदविले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरभ व्हावी, यासाठी मंडळाकडून विषयनिहाय लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प तसेच अंतर्गत मुल्यमापन यानुसार किती गुण आहेत, हे स्पष्ट केले आहे. (CBSE Exams)

 

सीबीएसईने यासंदर्भात सर्व संलग्न शाळांना सुचना केल्या आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या सर्व विषयांना एकूण १०० गुण असतील. यामध्येच लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प आणि अंतर्गत मुल्यांकन अशी गुणांची विभागणी करण्यात आली आहे. इयत्ता १० वीच्या ८३ विषयांसाठी आणि १२ वीच्या १२१ विषयांसाठी गुणदानाची हीच पध्दत असणार आहे. १० वीच्या संगीत, चित्रकला, संगणक इत्यादी विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ५० गुणांच्या असतील. तर इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्राच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत.

SSC, HSC Exam : फॉर्म नं. १७ भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ

 

इयत्ता बारावीच्या भूगोल, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान या विषयात प्रात्यक्षिक ३० गुण आहेत. चित्रकला, ग्राफिक्स, नृत्य आणि गृहविज्ञान या विषयात ५० गुणांचे प्रात्यक्षिक असेल. सीबीएसईने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, "प्रात्यक्षिक/प्रकल्प/अंतर्गत मूल्यमापनाचे गुण अपलोड करताना शाळांकडून चुका होत आहेत.

 

शाळांना प्रात्यक्षिक/प्रकल्प/अंतर्गत मूल्यमापन परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आणि लेखी परीक्षा आयोजित करण्यात मदत करण्यासाठी, इयत्ता १०वी आणि १२वीच्या विषयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासोबतच महत्त्वाच्या माहितीसाठी परिपत्रक काढण्यात आले आहे.

विषयनिहाय गुण पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k