भारत सरकारच्या ओएनजीसी कंपनीत 2700 हून अधिक पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू

फ्रेशर्स उमेदवार ही अप्रेन्टिसशिपची ट्रेनिंग पूर्ण करून अनुभव प्राप्त करू शकतात. तसेच, ट्रेनिंगच्या कालावधीत उमेदवारांना स्टायपेंड देखील दिलं जाईल. ONGC अप्रेन्टिसशिप भरतीसाठी अधिकृत पोर्टलवर अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

भारत सरकारच्या ओएनजीसी कंपनीत 2700 हून अधिक पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. भारत सरकारच्या ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) कडून तब्बल 2 हजार 700 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर (Recruitment for more than 2 thousand 700 posts) करण्यात आली आहे. कंपनीकडून विविध ट्रेड्स आणि विभागांमध्ये अप्रेन्टिस ट्रेनिंगसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना 6 नोव्हेंबर 2025 (November 6th deadline) पूर्वी www.apprenticeshipindia.gov.in या अप्रेन्टिस पोर्टल किंवा nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल.

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण

फ्रेशर्स उमेदवार ही अप्रेन्टिसशिपची ट्रेनिंग पूर्ण करून अनुभव प्राप्त करू शकतात. तसेच, ट्रेनिंगच्या कालावधीत उमेदवारांना स्टायपेंड देखील दिलं जाईल. ONGC अप्रेन्टिसशिप भरतीसाठी अधिकृत पोर्टलवर अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असण्यासोबत त्यांच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय / बी. कॉम / बीएससी/बीबीए / ग्रेजुएट/ डिप्लोमा/ बीई / बीटेक इंजीनियरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 6 नोव्हेंबर 2025 ही तारीख लक्षात घेऊनच उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. म्हणजेच या भरतीमध्ये 6 नोव्हेंबर 2001 ते 6 नोव्हेंबर 2007 यादरम्यान जन्मतारीख असलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. अधिक आणि तपशीलवार माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.